लहानणापासून दिवाळीच्या आगमनाची चाहूल बालमनात किल्ला करण्याच्या विचाराने येत असे. दर वर्षी नव्याने किल्ला करणे, त्यावर तटबंदी, बुरूज, तलाव करणे हिरवळ लावणे, रंगकाम करून देखणा किल्ला करणे यासारखी मोठी पर्वणी लहानमनापुढे दुसरी नाही. कॉलेजची काही वर्षवगळता नंतरही किल्ला बनवणे चालू होते.
सिंगापूरात आल्यानंतर पहिली ६-७ वर्ष न चुकता किल्ला बनवीत असे. ८ वर्षांपूर्वीच्या या आठवणी पुन्हा आज ताज्या झाल्या हा मस्त विडीओ पाहून
किल्ला स्वच्छ करायला मी मदत करीन
हा विडिओ माझा नाही. हा बनवणाऱ्याच्या टीमचा हेतू मात्र मला १००% पटतो.
आपण सर्वांनी किल्ला पहायला आवर्जून जावे. आणि तिथे फिरताना ते आपले घर मंदीर किंवा जपून वापरायची जागा हा भाव मनांत ठेऊन त्या भव्य वास्तूची काळजी घ्यावी
बाकी काय करावे करू नये ह्या सुचना आपल्या आपण ठरवाव्यात
सुरेख मेसेज, का कुणास ठाऊक, पण व. पु. यांचाच असावा असे वाटते. थोडक्याच शब्दात जीवनातील आनंदाचे रहस्यच उलगडून दाखविले आहे.
शुभ्र दही पाहिलं की तोंडाला पाणी सुटतं, खायचा मोह होतो. पण चमचा बुडवला, की दही मोडणार, थोड्या वेळाने चोथापाणी होणार, हे ठरलेलं! पण म्हणून मी ते मोडलंच नाही तर? दिवसांखेरी, ते आंबट होऊन जाईल. अजून काही दिवस तसंच ठेवलं, तर खराब होऊन जाईल. मग उपयोग काय त्या मस्त लागलेल्या दह्याचा?
मनात विचार आला, आयुष्याचंही असंच असतं … नाही का ? दह्यासारखं ‘set’ झालेलं आयुष्य, नक्कीच आवडेल ! पण ते आयुष्य तसंच set राहिलं, तर त्यातली गोडी निघून जाईल. सपक होईल. …. वायाच जाणार ते.
त्यापेक्षा रोजच्या रोज, आयुष्याचं दही नव्यानं विरजायचं. आयुष्याची गोडी चाखायला तर हवीच ! आयुष्य जगायला तर हवंच !
दिवसभर ते दही वेगवेगळ्या रूपामध्ये अनुभवायचं ! कधी साखर घालून, तर कधी मीठ, कधी कोशिंबिरीत, तर कधी बुंदीत, तर कधी कोणत्या ग्रेव्हीत ! कधी जेवून तृप्त झाल्यावर ताक म्हणून ! मला ना, ह्या ताकाचा … हवं तितकं पाणी सामावून घेण्याचा गुणधर्म फार आवडतो.
अर्थात, कुठचाही अतिरेक झाला, तर आयुष्य पांचटच होतं ! हरेक दिवसाच्या पदार्थ क्रियेची नजाकत वाढवता आली पाहिजे.
मात्र एक नियम कटाक्षाने पाळायचा ! पूर्ण दही संपवायच्या आधी, रोज थोडं विरजण बाजूला काढून ठेवायचं ! ‘उद्याचं’ दही लावायला !
मग रात्री झोपण्यापूर्वी, दिवसभरात जगलेल्या उबदार क्षणांनी,परत नव्यानं दही विरजायचं. #मा_आ_वि #दही #आयुष्य
तर मंडळी, दोन गोष्टी आपल्या लई म्हणजे लई आवडत्या बघा! मराठी भाषा आणि खाद्यसंस्कृती (शुद्ध मराठीत- खा दा डी). दोन लाडक्या गोष्टी एकत्र आणाव्या असा विचार आला. खाणं आणि निरनिराळ्या खाद्यपदार्थांवरच्या मराठी म्हणी आणि वाक्प्रचार आठवायला सुरुवात केली. पण कसलं काय, मनात मांडे आणि पदरात धोंडे! कामांच्या व्यापातून वेळ मिळेना.
चार तरी म्हणी लेकाला सांगता येतात का पाहूया म्हणून त्याला विचारलं. पण कोल्ह्याला द्राक्षं आंबट. म्हणतो कसा, “आई, तू लिही आणि मला वाचून दाखव. एखादी राहिली तर मी सांगतोच.” म्हटलं वा! हे म्हणजे घरात नाही दाणा आणि मला बाजीराव म्हणा! हा आपला आयत्या पिठावर रेघोट्या ओढणार. शेवटी मीच सुरु केलं. तसंही म्हणतात ना, सतरा सुगरणी आणि भोपळा अळणी ! बघू तरी किती आठवतात…
आपण ज्या युगात आज जगत आहोत, त्यात येणाऱ्या सर्व संकटांना धैर्याने सामोरे जाण्यासाठी जर आपल्याला कशाची आवश्यकता असेल तर ती खंबीर मनाची आणि मन संवादाची. आपल्या या अत्यंत चंचल अशा मनावर संस्कार घडवून त्याला सन्मार्गाला लावण्यासाठी आणि कणखर बनवून आपल्या तसेच पुढील पिढीला सक्षम बनवण्यासाठी श्रीसमर्थ रामदासांनी २०५ मनाचे श्लोक रचले आहेत.
हे मनाचे श्लोक दुसऱ्यांना उद्देशून सांगावयाचें नसून स्वतःच्या मनाला सांगण्यासाठी आणि आचरणात आणण्यासाठी आहेत. #मा_आ_वि, #मनाचे_श्लोक
हे लक्षात घेऊन आणि त्याचा अर्थ समजून जेव्हा वाचतो तेव्हा मिळणारा आनंद अवर्णनीय असेल. समर्थांनी या सुंदर अशा मनाच्या श्लोकांतून भिरभिरणाऱ्या मनाला वरचेवर जागेवर आणण्यासाठी राम नाम हा सर्वार्थाने एकच उपाय असे सांगितले आहे.
जगात जन्माला येणारा प्रत्येक जीव स्वतःसोबत भय, भ्रम आणि संशय घेऊन जन्माला येतो आणि हेच त्याच्या दुःखाचे कारण बनते. आपण कमवलेले नावलौकिक, संपत्ती तसेच आपल्या अंगी असलेले कर्तृत्व, बुद्धिमता, सौंदर्य ह्या सर्व गोष्टी आपण आपल्या मानतो किंवा आपण कमावलेल्या आहेत असा आपल्याला भ्रम असतो. कधी कधी तर ह्या गोष्टींचा गर्व होतो, जो आपल्याला विनाशाकडे घेऊन जातो. हे सर्व माझे आहे या भ्रमातून मग भय निर्माण होते. भर्तृहरि यांनी नीती शतकं मध्ये सांगितले आहे:
प्रत्येक गोष्टीला कशाचे तरी भय असते, जसे श्रीमंताला संपत्ती नाशाचे, बुद्धिवानाला आपल्यापेक्षा विद्वांनांसमोर हरण्याचे, सुंदर स्त्रीला वृद्धत्वाचे. मनाचे श्लोक आपल्याला शिकवतात पण यातले काहीच आपले नसते. आपल्या हातून घडणाऱ्या प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीचा कर्ताकरविता असतो तो फक्त राम, आपण फक्त निमित्तमात्र असतो.
याचे मला सुचलेले उदाहरण: न्यूटनने सफरचंद पडतांना पाहिले तेव्हा त्याला कळले की गुरुत्वाकर्षण या पृथ्वीच्या शक्तीमुळे ते घडते परंतु यापूर्वी सफरचंद झाडावरून पडत नव्हते का हो? परंतु या घटनेमागचे कारण समजावण्याची दृष्टी होती न्यूटनकडे. ही दृष्टी त्याला कोणी दिली? तर भगवंताने. त्या रामानेच. तो स्वतः माणसांना सिलेक्ट करत असतो आणि त्यांच्या माध्यमातून काम करवून घेत असतो.
आपलं मन, भय आणि भ्रम यांच्यापाठोपाठ आपल्याला घेऊन जातं ते संशय या अजून एका प्रवृत्तीकडे. आणि मनात एकदा कोणत्याही गोष्टीविषयी किंवा व्यक्तीविषयी संशय भरला की मग वाट चुकतेच विचारांची. हे जे भय, भ्रम आणि संशय यांच्यात गुरफटलेलं आपलं मन आहे त्याला योग्य दिशा देणारे असे हे समर्थ रामदासांनी रचलेले मनाचे श्लोक. ह्या २०५ श्लोकांमधून त्यांनी मनासोबत संवाद साधला आहे.
आपण पहिल्या दहा श्लोकांचा थोड्या-थोड्या टप्प्याने अर्थ पाहणार आहोत. (क्रमशः)
प्रत्येक हिंदूला “श्रीमद् भगवतगीते”च्या बाबतीत सर्व माहिती असायलाच हवी.
ॐ . कुणी कुणाला सांगितली..??? उ.- श्रीकृष्ण यांनी अर्जुनाला सांगितली.
ॐ . कधी सांगितली ??? उ.- आज पासून ७ हजार वर्षा पूर्वी सांगितली
ॐ. ईश्वरांनी कोणत्या दिवशी गीता सांगितली..??? उ.- रविवार च्या दिवशी…
ॐ. कोणत्या तिथि ला ??? उ.- एकादशी
ॐ. कुठे सांगितली…??? उ.- कुरुक्षेत्रच्या रणभूमि वर…
ॐ. किती वेळा मध्ये सांगितली..??? उ.- ४५ मिनीटे..
ॐ. का सांगितली…??? उ.- कर्तव्या पासून भरकटलेल्या अर्जुनाला कर्तव्य शिकवण्यासाठी आणि पुढ्या येणाऱ्या पिढ्यांना धर्म, ज्ञान आणि कर्तव्य कर्म शिकवण्यासाठी.. !!!
ॐ. किती अध्याय आहेत? उ.- एकूण १८ अध्याय.. !!!
ॐ. किती श्लोक आहेत? उ.- ७०० श्लोक
ॐ. गीता मध्ये काय काय सांगितलेले आहे..? उ.- ज्ञान-भक्ति-कर्म योग या मार्गांची विस्तृत व्याख्या केली आहे.., ह्या मार्गावर चालणाऱ्या व्यक्ती निश्चितपणे उच्चपदस्थ होतात..
ॐ. गीते ला अर्जुना शिवाय अजून कोणी कोणी ऐकलेले आहे.. ??? उ.- धृतराष्ट्र आणि संजय ने..
ॐ. अर्जुनाच्या आधी गीतेचे पावन ज्ञान कुणाला मिळाले होते.. ??? उ.- भगवान सूर्यदेवला..
ॐ. गीतेची माहिती कोणत्या धर्म-ग्रंथ मध्ये आहे.. ??? उ.- उपनिषदां मध्ये..
ॐ. गीता कोणत्या महाग्रंथाचा भाग आहे ??? उ.- गीता महाभारताचा एक अध्याय शांति-पर्व याचा एक हिस्सा आहे…
ॐ. गीता चे दूसरे नाव काय आहे…??? उ.- गीतोपनिषद
ॐ. गीतेचे सार काय आहे.. ??? उ.- प्रभु श्रीकृष्ण यांना शरण जाणे..
ॐ. गीते मध्ये कोणी किती श्लोक सांगितले आहेत ??? उ.- श्रीकृष्ण यांनीे- ५७४ अर्जुना ने- ८५ धृतराष्ट्र ने- १ संजय ने- ४० एकूण = ७००
एक हिंदू या नात्याने आपला धर्म ग्रंथ श्रीमद् भगवत गीता जो साक्षात भगवान कृष्णांनी सांगितलेले याची माहिती आपणा सर्वांना कळावी, म्हणून ही पोस्ट लिहिली, आवडल्यास पुढे नक्की अग्रेषित करावी आणि आयुष्यात एकदा तरी भगवतगीता वाचावी.
गणपतीने ज्या वर्णसंचाचा वापर करून महाभारत लिहिले असे मानतात त्या वर्णसंचात स्वर, व्यंजनांची वैशिष्ट्यपूर्ण मांडणी आहे.त्या वर्णसंचासाठी वेळोवेळी नवी चिन्हे निर्माण केली गेली. ती चिन्हे अनेकदा बदललीही गेली. त्या चिन्हांच्या सध्याच्या प्रचलित संचाला देवनागरी लिपी म्हणतात. ही लिपी सर्व जगासाठी, जगात अस्तित्वात असलेल्या सर्व भाषांचे सुसंगत लेखन करण्यासाठी अत्यंत सोयीची आहे.
यातील अ ते ज्ञ अक्षरे वळणदार, वैशिष्ट्यपूर्ण आहेत.
० ते ९ अंक देखणे आहेत. कोणताही देवनागरी अंक लिहिताना सुरुवातीला टेकवलेली लेखणी अंक लिहून होईपर्यंत उचलावी लागत नाही.
या लिपीतील चिन्हे १६ स्वर, ३३ व्यंजने व ३ संयुक्त व्यंजने यांचे प्रतिनिधित्व करतात.
५२ मुळाक्षरांच्या परस्पर संयोगाने जोडाक्षरे, बाराखड्यांच्या स्वरुपात लाखो स्वतंत्र अक्षरसमूह (जोडाक्षरासहित) चिन्हे लिहिता येतात. अशा काही लाख चिन्हांच्या अचूक व नेमक्या आकलनासाठी केवळ मूळ ५२ चिन्हांची अक्षर आकार ओळख आणि ती अक्षरे एकमेकांना जोडायची पद्धत यांची जाण पुरेशी ठरते !
भारतीय भाषांसाठी योजलेल्या गणेशविद्या आधारित लिप्या वगळता जगातील इतर अनेक लिप्यांमध्ये अशी अल्प परिचयातून उपलब्ध होणारी चिन्ह संपन्नता आढळत नाही.
गणपतीने म्हणजे देवाने ही वर्ण व्यवस्था नागरिकांसाठी बनविली या समजुतीने तिच्या आजच्या एका चिन्हित रूपाला देवनागरी लिपी म्हणतात.
या वर्ण व्यवस्थेचा उगम गणपतीच्या हातूनच कसा झाला याबाबत पुढील एक आख्यायिका प्रचलित आहे !
महर्षी व्यासांना महाभारत हे महाकाव्य लिहायचे होते ! ते वेगाने लिहून होण्यासाठी त्यांनी श्रीगणेशाला लेखनिक होण्याचे आवाहन केले !
गणपतीने हे आवाहन मान्य करताना एक अट घातली. गणपतीने लिहायला प्रारंभ केला की, त्याचे लिखाण सतत सुरू राहील. ही अट पूर्ण करायला महर्षी व्यासांना सतत महाभारताची कथा सांगत रहावी लागणार होती. ही कथा सांगताना गणपतीने घातलेली अट पाळतानाही आपल्याला अधूनमधून थोडीशी उसंत मिळावी अशी त्यांची इच्छा होती. त्यासाठी व्यासांनीही एक युक्ती योजली.
त्यांनी गणपतीला सुचवले की, महाभारत लिहिण्यासाठी गणपतीने मानवी शरीराशी घनिष्ठ संबंध असेल अशी नवी वर्ण व्यवस्था निर्माण करावी आणि त्या वर्णांसाठी स्वतंत्र चिन्हेही निर्माण करावीत तसेच नवी लेखन पद्धती देखील विकसित करावी ! ही नव्याने विकसित केलेली वर्ण व्यवस्था ध्वनीवर आधारित असावी जेणेकरून उच्चार आणि लेखनात सुसंगती येईल.
श्रीगणेशाने व्यासांची ही सूचना मान्य केली. या सूचनेमुळे महाभारत सांगताना व्यासांना अधूनमधून थोडी उसंत मिळणार आहे हे गणपतीच्या लक्षात आले. असे असले तरी मानवाला मानवी शरीराशी जोडलेली नवीन वर्ण व्यवस्था मिळून सर्व पृथ्वीचे कल्याणच होणार असल्याच्या भावनेतून गणपतीने व्यासांची सूचना मनःपूर्वक स्वीकारली !
गणपतीने महाभारत लिहिताना व्यास कथा सांगत असताना त्यांच्या सर्व उच्चारांचे सूक्ष्म शरीरशास्त्रीय अवलोकन केले. व्यासांच्या कथनादरम्यान ज्या ध्वनींचा संबंध मानवी मुखाशी आढळला ते ध्वनी वेगळे करून त्यांना गणपतीने स्वर मानले. ज्या ध्वनींचा संबंध एकेका मानवी मणक्यांशी होता अशा ध्वनींना गणपतीने व्यंजने मानले. स्वर आणि व्यंजने तसेच व्यंजन आणि व्यंजने यांच्या चिन्ह संयोगाने प्रचंड संख्येने स्वतंत्र अक्षरचिन्हे निर्माण होऊ शकतात. जोडाक्षर संकल्पनाही गणपतीनेच वेगवान लिखाणासाठी निर्माण केली असा समज पूर्वापार प्रचलित आहे ! मानवी उच्चारांशी सर्वाधिक सुसंगत लेखन करण्यासाठी ही लिपी उपयुक्त आहे !
कर्नाटकात जन्मलेल्या आणि काशीला आश्रम उभारलेल्या गणेश हेब्बार उपाख्य गणेशशास्त्री यांनी लिहून प्रसिद्ध केलेल्या ‘भारतीय लिप्यांची एकात्मता’ आणि ‘भारतीय लिप्यांची मौखिकता’ या दोन पुस्तकामधून पंजाबी, बंगाली, उडिया, असमी, मल्याळम, तमिळ, गुजराती तसेच आज वापरात नसलेल्या पण पूर्वी वापरात असलेल्या आणखी काही भारतीय लिप्या व देवनागरी लिपी यातील साम्य दाखवून दिले आहे !
ही लिपी खरेच देवाधिदेव गणपतीने बनविली का ? यावर आस्तिक, नास्तिकांचा वाद सुरु आहे, पण ही जगातील अत्यंत उपयुक्त लिपी आहे, याबाबत मात्र आस्तिक आणि नास्तिक दोन्ही समूहांमध्ये बऱ्यापैकी एकमत आहे..
सध्या कोणीही केलेल्या संशोधनाची नोंद त्या संशोधकाच्या नावाने करण्याची पद्धत आहे. पूर्वी अशी पद्धत नव्हती.
कोणी संशोधन केले, कविता रचली तर त्यातच संशोधकाचे, कवीचे नाव गुंफण्याची अथवा त्यासंबंधी नामानिधान किंवा संज्ञांमध्येच संबंधिताचे नाव गुंफण्याची पद्धत होती.
शल्याने शरीर कापून त्यात दुरुस्तीची पद्धत सुरु केली, त्या पद्धतीला शल्यकर्म म्हणतात.
रुग्णांची नियोजनपूर्वक देखभाल पद्धत शुश्रुताने सुरु केली, त्या पद्धतीला शुश्रूषा म्हणतात.
डिझेल नावाच्या शास्त्रज्ञाने शोधलेल्या इंधनाला त्याचे नाव आहे.
सुखकर्ता दुखहर्ता …. या आरतीत ‘दास रामाचा वाट पाहे’ असे लिहून समर्थ रामदासांनी स्वतःची ओळख सूचित केली आहे.
एका जनार्दनी श्री दत्त ध्यान, तुका म्हणे, येणे वरे ज्ञाना सुखिया झाला, केशवासी नामदेव भावे ओवाळिती, कहत कबीर सुन भाई साधू अशा ओळींतून जनार्दन स्वामी, तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव, कबीर यांनी आपले नाव गुंफले आणि विशिष्ट कलाकृती त्यांनीच निर्माण केल्याचे सूचित केले.
देवनागरी वर्णाक्षरांच्या सध्याच्या स्वरुपात ग, ण, श ही अक्षरे इतरांपेक्षा वेगळी असून केवळ त्यांच्याच बाराखडीत डावीकडून पहिल्या स्थानी सुट्टा काना आहे!
ग, ण, श यांच्याच बाराखडीत डावीकडून पहिल्या स्थानी सुट्टा काना असणे ही बाब लक्षणीय असून ही वर्ण व्यवस्था गणपतीने निर्माण केल्याचा संकेत मानून देवनागरी लिपीला देवनागरीच्या धार्मिक प्रवृत्तीच्या कोण्या समर्थकाने या लिपीला गणेशविद्या म्हणले व ते नाव रूढ झाले आहे. गणपती अथर्वशीर्ष म्हणताना त्यात ‘ ए सा गणेशविद्या ‘ असे एक वाक्य येते त्याचा संदर्भ श्रीगणेशानेच देवनागरी लिपीची मूळ वर्ण व्यवस्था निर्माण करण्याशी जोडलेला आहे !
देवनागरी लिपीत १६ स्वर, ३३ व्यंजने आणि ३ संयुक्त व्यंजने आहेत. स्वरांचा मानवी मुखाशी तर व्यंजनांचा मानवी मणक्यांशी संबंध आहे.
कान या मराठी शब्दाची सुरूवात क अक्षराने होते. चेहरा व दोन कान दिसतात तसे क अक्षरचिन्ह दिसते.
ड, ळ अक्षरांनी डोळा शब्द बनतो. उघडा डोळा, भिवई, पापणी मिळून ड चा भास होतो.
दोन डोळे एकत्र पाहताना ळ चा भास होतो.
झोपलेल्या माणसाचे नाक पाहून न चा भास होतो.
घसा तपासताना वैद्यबुवांना घ दिसतो.
मानवाला प्राथमिक अवस्थेत ज्या वस्तूंना नावे देण्याची गरज भासली, ती नावे लिहिण्यासाठी देवनागरी अक्षरांना त्या वस्तूंचे आकार दिले असावेत.
मुखाशी संबंधावरून देवनागरी लिपीतील ३३ व्यंजने आणि ३ संयुक्त व्यंजने मिळून ३६ वर्णांचे मिळून दंतव्य, तालव्य, ओष्ठव्य, मूर्धन्य, अनुनासिक हे पाच प्रकार आहेत.
वेगवेगळी व्यंजने उच्चारताना वेगवेगळ्या मणक्याजवळ संवेदना जाणवतात.
कोणीतरी अभ्यासू व्याकरणकाराने आणि शरीरशास्त्राच्या जाणकाराने कधीतरी देवनागरी वर्ण आणि मानवी मणके यात आढळलेला एकास एक संबंध नोंदवून ठेवला आहे. हा एकास एक संबंध म्हणजे ३३ मणके आणि ३३ व्यंजने यांचा परस्पर संबध आहे. मानेच्या खाली पाठकणा सुरू होतो तिथपासून वरून खाली १ ते ३३ क्रमांक मणक्यांना दिल्यास कोणत्या क्रमांकाच्या मणक्याशी नेमके देवनागरी लिपीतील कोणते व्यंजन जोडलेले आहे हे या संबंधात सूचित केलेले आहे ! हा क्रम लिप्यांचे हौशी अभ्यासक असलेले माझे एक जेष्ठ सहकारी सुधिर नारखेडे यांनी मला उपलब्ध करून दिला. मी त्या क्रमानुसार एक चित्र निर्माण केले आहे.
मानवी शरीराशी, मानवी जीवनाशी देवनागरी लिपीचा घनिष्ठ संबंध असल्याने मानवी उच्चारांना अचूक लेखनाची जोड देण्यास आवश्यक सोयी देवनागरी लिपीत, जोडाक्षर पद्धतीत आहेत.
कोणत्याही मानवी भाषेतील ९९.९९ टक्के शब्द या लिपीतून हुबेहूब लिहिता येत असल्याने ही लिपी जगाची भाषिक एकात्मता साधू शकेल.
लेखन, उच्चारात सर्वाधिक सुसंगतीसाठी ही जगातील सर्वोत्तम लिप्यांपैकी एक आहे.
देवनागरी लिपीचिन्हांत आणि बंगाली, गुजराती, कन्नड, पंजाबी, तमिळ, उडिया, तेलुगू , मल्याळी लिपीचिन्हांत थोडा बदल जाणवतो पण सर्व भारतीय लिप्यांमध्ये लक्षणीय एकात्मता आहे !
लिपीचिन्हांतील या बदलांची कारणे भौगोलिक, राजकीय आहेत.
लिखाणासाठी भारताच्या उत्तरेत भूर्जपत्रे तर दक्षिणेत ताडपत्रे वापरत.
भूर्जपत्राला पुरेशी उंची असल्याने देवनागरी लिपीतील मात्रा, रफार, रुकार, उकार, अनुस्वार, चंद्र, हलन्त उपचिन्हे वगैरे गोष्टी वर्णाक्षरांच्या वर, खाली जोडता येतात.
ताडपत्रावर उंची कमी, रुंदी अधिक म्हणून दक्षिणी लिप्यांमध्ये ही उपचिन्हे वर्णाक्षरांच्या डावी, उजवीकडे लिहिणे सोयीचे होते.
अनेक देवनागरी अक्षरे आडवी केल्यास दक्षिणी लिपीतील अक्षरे मिळतात. शत्रूला संदेश समजू नये म्हणून काही भारतीय राजांनी स्वत:ला व त्याच्या अधिकार्याना, प्रजाजनांना समजणारी, पण इतरांना न समजणारी भाषा, लिपी तयार केली. काही राजांनी स्वतंत्र राज्याच्या स्वतंत्र झेंडा, स्वतंत्र राजचिन्ह याप्रमाणेच स्वतंत्र लिपीही हवी अशा विचाराने अस्मितेचे आणखी एक प्रतीक म्हणून नवी लिपी घडवून घेतली.
देवनागरी लिपीशी बरेच साम्य आणि किरकोळ बदलाने अशा विविध कारणांनी विविध नव्या लिप्या निर्माण झाल्या.
अनेक भारतीय लिप्यांतून लिहिताना जगातील इतर अनेक लिप्यांच्या तुलनेने कमी जागा, कमी कागद, कमी शाई वापरली जाते. कागद कमी लागल्यास जंगलतोड कमी होते. शाईत शिसे किंवा जड धातू वापरतात. शाई कमी लागल्यास शिशाचे व जड धातूंपासून होणारे प्रदूषण कमी होते.
१७७७ रु. धनादेशाने देताना रोमन लिपीसह इंग्रजीत one thousand seven hundred seventy seven only ही ३९ अक्षरे तर मराठीत सतराशे सत्त्याहत्तर फक्त ही ११ अक्षरे लागतात.
जगात रोज कोट्यवधी धनादेश देवाणघेवाण होते, त्यात अक्षरी रक्कम तीन वेळा लिहितात, १४ ते १९ वेळा वाचतात. धनादेश भारतीय भाषांत लिहिल्यास इंग्रजीच्या तुलनेत ७० % वेळ, ७० % शाई वाचते. व्यवहार वेगाने होतात. कार्यक्षमता वाढते.
थोडक्यात, देवनागरी लिपी पर्यावरणाचा विनाश कमी करण्यासाठी उपयुक्त आहे !
देवनागरी लिपीचा पुरेपूर लाभ घेतला पाहिजे. या लिपीत कोणताही मजकूर कमी जागेत, कमी श्रमात लिहिता येतो म्हणून केवळ आर्थिक व्यवहार नव्हे तर शिक्षण, संशोधन, व्यापार, सेवा उद्योग, प्रशासन अशा सर्व क्षेत्रात ही लिपी आणि मराठी भाषा यांचा दुहेरी वापर केल्यास आर्थिक बचत, पर्यावरण रक्षण आपोआपच होईल.
देवनागरी लिपी भारतीय/जागतिक एकात्मतेचे साधन ठरेल.
घरी, बाजारात, बँकेत, कचेरीत, व्यवसायात, पत्रकात, पावतीत, प्रत्येक व्यवहारात ही लिपी वापरल्यास आपण अधिक सुखी, समृद्ध, आनंदी होऊ !
ही लिपी सर्व जगाला उपयुक्त असल्याने ‘गणेशविद्या’ बाबतची माहिती देशी,परदेशी लोकांना सतत दिली पाहिजे. परदेशी व्यवहारात इतर लिपीसह ही लिपी वापरवी. परदेशातून येणाऱ्या मालावर विविध भाषा, लिपीतील मजकूर असतो तसा भारतीय व्यावसायिकांनी बाजारात, बँकेत, कचेरीत, व्यवसायात, पत्रकात, पावतीत, व्यवहारात, पत्रव्यवहारात, वस्तूंच्या वेष्टनावर, आवरणावर देवनागरी लिपी वापरून गणेशविद्येचा प्रसार जगभर करावा !
आणि अनेक क्षेत्रातील मूलभूत गोष्टी भारताने यापूर्वी जगाला दिल्या.
जागतिकीकरणात जगाकडून काही घेताना जगाला चांगले काही देणेही अपेक्षित आहे. जगातील सर्वोत्तम लिपी जगाला देण्यासाठी ‘गणेशविद्या’ चे जागतिकीकरण करू या !
बीजगणिताचे सिद्धांत, शून्याची कल्पना, खगोल, भूमिती, आयुर्वेदिक औषधी, मुलींच्या शाळा, कुटुंबनियोजनाचे तत्त्व, स्वातंत्र्याची इच्छा, बँकेची कल्पना, न्याय्य कररचना, शेतीसुधारणा, विधवा विवाह या सामाजिक सुधारणांपासून अवकाश तंत्रज्ञान, संगणकीय ज्ञान, माहिती तंत्रज्ञान या अनेक उत्तम गोष्टी आपण जगाला दिल्या, जगाने अशा बाबतीत आपले अनुकरण केले.
जगाला उत्तमोत्तम गोष्टी देणारे सर्व भारतीय ‘गणेशविद्या’ जगभर पोचविण्याचे कार्य करतील, असा मला विश्वास वाटतो! आपण सुरुवात तर करू, जग आपले अनुकरण करेल. निवेदक :- प्रा. अनिल गोरे.
सदस्य : भाषा सल्लागार समिती, महाराष्ट्र शासन;
सदस्य आणि समन्वयक : कृषी परिभाषा उपसमिती, महाराष्ट्र शासन.
सदस्य : मराठी भाषा संवर्धन समिती, पुणे महापालिका;
आजीव सदस्य : महाराष्ट्र साहित्य परिषद;
आजीव सदस्य : मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग;
आजीव सदस्य : महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभा, पुणे.
आजीव सदस्य : पुणे जिल्हा गणित अध्यापक मंडळ
आजीव सदस्य : अक्षर मानव
सदस्य : कोथरूड गौरव समिती, पुणे.
निवेदन :- हे पत्रक ज्यांच्यापर्यंत पोचेल त्यांनी गणेश मंडळ अहवाल, संस्था अहवाल, मासिके, पाक्षिके, वार्षिके, त्रैमासिके, अनियतकालिके, भ्रमणध्वनी संदेश, संगणकीय विरोप, सूचना फलक, पाट्या, समाज माध्यमे याद्वारे कायदेशीर मार्गाने यातील मजकूर देशात, परदेशात कोट्यवधी लोकांपर्यंत पोचवावा, ही वैयक्तिक विनंती ! अशा प्रकारे हाच आशय जसाच्या माझ्या नावासह कोणालाही पुढे पाठविण्यास मी या इथेच मुक्त परवानगी देत आहे ! तसेच यातील आशय कोणीही विनामूल्य वापरण्यास माझी सहर्ष संमती आहे !!
हा मजकूर कोठे छापल्यास प्रत पाठवावी. इतर प्रकारे प्रसिद्ध केल्यास त्याची माहिती कळवावी, ही विनंती ! अनिल गोरे (संपर्क क्र. : ९४२२००१६७१ )
हरविलेली हिंदु साम्राज्य अर्थात आमची इतीहासाबद्दलची बेदरकारी——–लेखांक ४
चंपा हया नावाचे हिंदु साम्राज्य सध्याच्या दक्षीण व्हिएट्नाममध्ये होते हे साधारण आपल्या देशातल्या फ़ार फार कमी लोकांना माहीती असते,ते कुठे होते हे माहीत असणे दूरची गोष्ट. हे राज्य अथवा हा राज्यसमूह हा हिंदु साम्राज्याचे पूर्वेचे जवळ जवळ टोक होते.जिज्ञासूसाठी मी या राज्याच्या नकाशाची लिंक खाली देत आहे.
या राज्याचे नाव इतीहासात चिनी कागदपत्रात [भारतात आम्ही इतीहास हा कागदपत्रांवर नाही भ्रामक आणि खूळचट समजुतींवर आधारतो.] साधारण इ.स. १९२ च्या आसपास येते. इसवी सनाच्या पहिल्या शतकात खू लिएन नावाच्या एका स्थानीक राजाने चीनी सम्राटांविरुध्द बंड करुन हिंदु धर्म स्विकारला आणि चंपा राजवटीची घोषणा केली.
उत्तर व्हिएट्नाम हा चीनच्या अधीपत्याखाली होता त्यामुळे या राज्याच्या चीनी सम्राटांशी सतत लढाया चालू होत्या. दूसरया ते सातव्या शतकात या राज्याबद्दल फार माहिती नाही. यांची राजधानी सुरवातीला सिंहपुर येथे होती.या राजवटीच्या ४ थ्या शतकापर्यंत च्या राजांची संस्कृत नावे इतिहासाला माहित नाहीत, चिनी नावे आहेत.
या काळात यांनी बरेच बांधकाम केले आणि विष्णूची मंदीरे बांधली.हे लोक मलाई-पालिनेशियन वंशसमुहाचे होते.यांना “चाम,चम अथवा त्सयाम ” वंशसमूह म्हणत आणि त्यांची भाषाही चम भाषा होती.
इ.स.चवथ्या शतकातल्या चम भाषेतल्या शिलालेखात लिहीले आहे की महर्षी भृगुच्या कूळातल्या ब्राह्मणांनी समुद्र मार्गाने येउन या लोकांना वेदिक धर्माची दिक्षा दिली.
चिनी दरबारातल्या कागदपत्रात हे राज्य आपल्या सीमा सतत वाढवत असल्याचा उल्लेख आहे.हा गणराज्यांचा समुह होता आणि यातली नावारुपाला आलेली शहरे होती १] इंद्रपुरी २] अमरावती ३] विजया ४] कुठार ५] अतीशय आश्चर्यजनक नाव म्हणजे ” पांडूरंग ” .या पांडूरंग गावाचे आजचे व्हिएट्नामी भाषेतले नाव आहे “पान रंग “.
इ.स. ३/४ शतकात वैष्णव पंथाचा त्याग करुन हे लोक शैवपंथी झाले.इ.स. ४ थ्या शतकात यांचा प्रसिध्द राजा भद्रवर्मन होउन गेला.याच्या कारकीर्दीतले बरेच चम शिलालेख आहेत.शिव-ऊमा यांची उपासना होती. लोक विटांच्या घरात रहात ,कान टोचत, राजे लोक हत्तीवर जात आणि त्यांच्या डोक्यावर छ्त्र असे. लग्न हे दर महिन्याच्या अष्टमीला होत असे.मनुष्य मेल्यावर त्याचे दहन आणि अस्थीविसर्जन होते असे. जातिभेदाचा उल्लेख नाही. हे चम लोक फार चांगले नौका बांधणी कारीगर होते.या राज्यात बांधलेल्या नौका या चीन, दक्षीण भारत,लन्का, बर्मा, थायलंड, इंडोनेशिया इ. ठिकाणी निर्यात होत.
इ.स.४ थ्या शतकात संस्कृत शिलालेखही आढळायला सुरवात होते.भगदत्त नावाच्या राजाचा उल्लेख इ.स.५१६ मध्ये आहे.या राजाची राजधानी इंद्रपुरी होती,आणि त्याच्या दरबारी भारतातून आलेले असंख्य ब्राह्मण होते असा उल्लेख आहे.
इ.स. ८७५ मध्ये इंद्रवर्मन (२) या राजाने हिंदु धर्माचा त्याग करुन बौध्द धर्म स्विकारला.
इ.सनाच्या ९/१० शतकात ही राज्ये वैभवाच्या शिखराला होती. व्हिएटनाम मधल्या माई सोन या गावापाशी या राजवटीने बांधलेला देउळ समुह आहे हा कंबोडियातल्या अंगकोर वाट पेक्षा लहान आहे पण शिल्पकलेचा अतिशय उत्कृष्ट नमुना आहे. इंटरनेट्वर याचे फोटो बघा,फार सुंदर आहेत.
इ.स. ९७५ मध्ये उत्तर व्हिएट्नामशी झालेल्या अनेक युध्दात पराभव झाल्यावर या राजांनी इंद्रपुरी सोडून आपली राजधानी दक्षीणेला विजया इथे हलविली. १०२१,१०२६ आणि १०४४ मध्ये उत्तरेशी युध्दे झाली त्यात पराभव झाल्याने हे राज्य अजुन संकोच पावले आणि यानी आपली राजधानी “पांडूरंग” इथे हलविली.या काळात राजा रुद्रवर्मन होता. या सर्व कालखंडात आपल्या रीतीप्रमाणे हे राज्य शेजारच्या हिंदु कंबोडियाशी लढण्यात धन्यता मानत होते.
इ.स.च्या १० शतकात शैव पंथ पुन्हा या राज्याचा धर्म झाला. यांचा भारताशी संबध आणि संपर्क साधारण ७ व्या शतकातच तूट्ला होता १३०७ मध्ये जय सिंहवर्मन राजाने आणखी मुलुख गमावला. १४०६ मध्ये चंपाधिराय या राजाचा व्हिएट्नामने पराभव करुन ३ प्रांत जिंकून घेतले. चंपा राज्याचा शेवटचा मोठा राजा हा ” चे बुंगा” होता. आपला संपर्क तूटल्याने याचे खरे नाव इतिहासाला अज्ञात आहे. याने चंपा आपल्या अधिअपत्याखाली इ.स. १३६० ते १३९० मध्ये एकत्र केला आणि व्हिएट्नामचा पराभव करत थेट सध्याच्या हनोई पर्यंत धडक मारली.
१४४६ पासुन व्हिएट्नामच्या फौजांनी या राज्याला पराभुत करायला सुरुवात केली.१४७० मध्ये उत्तर व्हिएट्नामशी झालेल्या युध्दात या राज्याचा पूर्ण पराभव झाला.विजयानगरी नष्ट झाली आणि व्हिएटनामी लोकांनी ६०,००० चम लोकांची कत्तल केली. यानतंर रडत खडत व्हिएट्नामच्या ताब्यातले एक संस्थान म्हणून हे राज्य पांडूरंग या गावी इ.स. १८३२ पर्यंत अस्तित्वात होते.
इ.स. च्या १५ व्या शतकात या राज्यातले बहुसंख्य लोक शातंतापूर्वक मुस्लिम झाले. या मुस्लिम झालेल्या राजांची पदवी तरीही ” शक्तीराय ” होती. मला नाही वाट्त या १८३२ पर्यंत अस्तीत्वात असलेल्या राज्याशी कोणी भारतियांनी संपर्क साधला असेल.
अर्थात जो समाज अमाप कर्तुत्वाच्या पहिल्या बाजीरावासारख्या पुरुषाचा मस्तानीपासुन झालेल्या समशेर बहाद्दरचे उपनयन करायला नकार देउन त्या वंशाला बांद्याचे नवाब बनवतो आणि एका कर्तुत्ववान पुरुषाचा वंश परधर्मात जाउ देतो त्या समाजाकडून काय अपेक्षा ठेवणार.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे अजुनही या चम लोकांमध्ये थोडे हिंदु लोक आहेत. विश्व हिंदु परीषदेच्या विश्वपणामध्ये ह्या हरवलेल्या आणि उरलेल्या थोड्या काही चम हिंदु बांधवाशी संपर्क साधणे आले तर किती बरे कारण या राजवटीची दप्तरे पांडुरंग या गावामध्ये म्युझीयममध्ये आहेत त्याचा अभ्यासही जरुरी आहे. मला राहुन राहुन एका गोष्टीचे आश्चर्य वाटते की हा असा वैभवशाली इतिहास अभ्यासायचे सोडून आपला समाज स्वामींच्या चरीत्राची पारायणे करण्यात धन्यता का मानतो.
आमच्या समाजाला स्वतःचा नाश होतांना दिसत नाही का? का आमची बुध्दी,आमची प्रज्ञा,आमचे भविष्याचे ज्ञान या सगळ्याला धर्म आणि देश संरक्षण यासाठी विज्ञाननिष्ठ तल्लख बुध्दी लागते हे का दिसत नाही अथवा ती बुध्दी सध्याच्या काळात आर्थीक तलवार असते हे सत्य का दिसत नाही!!
रस्ते स्वच्छ ठेवा,जागोजागी थुंकु नका,झाडे लावा, वाह्तुकीचे नियम पाळा या साध्यासाध्या गोष्टींऎवजी शनीवारी मारुतीला तेल कुठल्या पळीने वाहावे, सिध्दीविनायकाच्या उंदराच्या कानात नवस का बोलावा इ. गोष्टी या समाजाला चर्चा करायला कशा आवडतात हे माझ्या अल्पमतीला खरोखरच कळत नाही.
खर्या हिंदु धर्माने आपल्या प्रज्वलित बुध्दीच्या उजेडाने शेकडो वर्षे हा भारत देश आणि आजुबाजुच्या देशांचा आसमंत उजळून टाकला होता हे चिरतंन सत्य कधी आपण ओळखणार आहोत.
हरवलेली हिंदु साम्राज्ये,अर्थात आमची इतिहासाबद्दलची बेदरकारी———–लेखांक ३
कुशाण साम्राज्य : पहिल्यांदाच माझे वाचक म्हणणार आहेत की कुशाण साम्राज्य आम्ही इतिहासाच्या पुस्तकात शिकलेले आहोत आता हा बाबा काय सांगणार आहे. पण नाही बर्याच प्रचलित कल्पनांना धक्का बसणार आहे. आपल्या इतिहासाच्या पुस्तकात हुण,कुशाण हे बाहेरुन आलेले आक्रमक म्हणून दिले आहेत.पण तसे नाही. हे राज्य आणि लोक चीनच्या ” जिनजियांग उघूर ” या मुस्लिम बहुवस्तीच्या प्रांतातुन ज्याची राजधानी “कशगार” ही आहे इथे उदय पावले. हे लोक पूर्णतः हिंदु होते .कशगारचे जुने नाव “काशी” होते. आजही कशगारला चीनी भाषेत “काशी” म्हणतात. जिज्ञासुसाठी मी या प्रांताच्या नकाशाची लिंक देत आहे.
लदाख, काश्मीरच्या उत्तरेला - राजधानी - कशाघर (काशी)
य़ांची भाषा ही तोखारियन[अ] आणि तोखारियन [ब] होती. ज्याची लिपी भारतीय ब्राम्ही होती. ब्राम्ही लिपी ही अफ़गाणिस्तान, पंजाब,सिंध येथे वापरली जात असे. या तोखारियन भाषा कालौघात विस्मृतीत गेल्या आणि पाश्चीमात्य संशोधकांनी शोधली आणि त्याला तुर्कि भाषेत तुर्फ़ानियन नाव होते म्हणून तोखारियन नाव दिले. तोखारियन ही भाषा संस्कृतशी फार जवळची आहे. यांची राज्यकारभाराची भाषा प्राकृत होती. प्राकृत ही भाषा जास्त करुन सिंध आणि अफ़गाणिस्तानात वापरली जात असे. आपल्या जुन्या पोथ्यात बर्याच वेळा मराठीचा उल्लेख प्राकृत असा होतो त्याचा आणि या भाषेचा सबंध जवळचा आहे . प्राकृत भाषा ही संस्कृतशी नाते असलेली बोलीभाषा आहे. प्राकृत हा शब्द प्रकृतः अर्थात नैसर्गीक,मूळचे या शब्दावरुन आला आहे ज्यावरुन प्रकृती हा शब्दही आला आहे तीन प्राकृत भाषा होत्या.शौरसेनी,मागधी आणि महाराष्ट्री [ज्यापासुन मराठी आली.] संस्कृत हा शब्द संस्कृतः या शब्दावरुन आला आहे ज्याचा अर्थ शुध्दीकरण केलेले,अर्क काढलेले, संस्कार केलेले ज्यावरुन संस्कृती हा शब्दही आला आहे. हे लोक सदैव चिनी सम्राटांशी लढत असत,जसे सध्याचे “सध्या चीनच्या जिनजियांग उघूर प्रांतातले लोक ” मधून मधून बंड करत असतात. ह्या राज्याच्या अस्तीत्वाचा आणि हिंदु धर्माचे उल्लेख साधारणपणे इसवी सनपूर्व दूसर्या शतकापासून मिळतात. चिनी हन राजवटीने हल्ला करुन या भागावर आपला कबजा इसवी सनपूर्व पहिल्या शतकात बसविला. कुशाण त्यानतंर दक्षीणे कडे उतरले आणि पुढच्या १०० वर्षात त्यांचे साम्राज्य अफ़गाणिस्तान,इराणचे तीन प्रांत,पाकिस्तान. पूर्ण उत्तर भारत,पंजाब,काश्मिर, ते थेट मथुरा, विदीशा, उज्जैन ते गुजराथच्या सरहद्दीपर्यंत पसरले,त्यानंतर त्यानी आक्रमण करुन त्यांचा मूळ प्रांत जो चीनचा सध्याचा जिनजियांग प्रांत तो सुध्दा जिंकुन चीनी सम्राटाला हुसकावून लावले आणि काशी अर्थात कसागर आपल्या ताब्यात आणले. या साम्राज्याचा परीघ इतका मोठा होता की त्यात सध्याचा उझबेकीस्तान,ताजिकीस्तान इ. होते.हे साम्राज्य कीती मोठे होते यासाठी याच्या नकाशाची लिंक मी खाली देत आहे.
कुशाण राज्य
सम्राट कनिश्काच्या काळातले राबातक शिलालेख मिळाले आहेत ज्यामध्ये कुशाणांच्या ताब्यातली शहरे दिली आहेत ती म्हणजे उज्जैन, कुंडीनपुर,साकेत कौसंबी,पाटलीपुत्र आणि चंपा. चीन मधल्या काशगर[काशी],यार्कंड आणि खोतान.इराण मधले ख्वारझेम. यांची पहिली राजधानी सध्याच्या उझबेकीस्तानातले “ऐनुतारा” हे शहर होते पुढे त्यांनी आपली राजधानी अफ़गाणिस्तानातल्या “बग्राम” [ नाव भ्रष्ट झाले पण शहराच्या नावातले ग्राम राहिले] या शहरात नेली.त्यांची हिवाळी राजधानी सध्याच्या पाकीस्तानातले “पुरुषशहर” उर्फ़ “पेशावर” इथे होती. अफ़गाणिस्तान मधल्या ” गांधार ” उर्फ़ “कंदाहार’ या प्रांतासाठी हा अक्षरशः सुवर्णकाळ होता. तसेच भारतातल्या मथुरा इथेही त्यांची राजधानी होती. हे राजे शैवपंथीय होते पण बुध्द,झरुतृष्ट,जुना ग्रीक इत्यादी धर्मांना फ़ार मोठा राजाश्रय होता.कनिष्काने पुढे बौध्द धर्म स्विकारला. यांचे गजदळ फ़ार मोठे होते,तसेच धातूविज्ञान बरेच प्रगत होते. या साम्राज्याबद्द्ल मला सर्वाधीक माहिती ताश्कंद म्युझीयमच्या catalogue मध्ये मिळाली. दुःखाची गोष्ट म्हणजे ही सगळी माहिती आपल्याला चीनी आणि नतंरच्या मुस्लिम इतिहासकारांकडून मिळते कारण इतिहास लिहिण्याच्या बाबतीत आपण लोक म्हणजे ” राम कृष्ण हरी”. या राज्याच्या राजांची जी थोडी-बहुत यादी आहे ती अशी आहे.
Kujula Kadphises (ca 30 – ca 80)
Vima Taktu or Sadashkana (ca 80 – ca 95)
Vima Kadphises (ca 95 – ca 127)
Kanishka I (ca 127 – ca 140)
Vāsishka (ca 140 – ca 160)
Huvishka (ca 160 – ca 190)
Vasudeva I (ca 190 – ca 230)
Kanishka II (c. 230 – 240)
Vashishka (c. 240 – 250)
Kanishka III (c. 250 – 275)
Vasudeva II (c. 275 – 310)
Vasudeva III, Vasudeva IV reported possible child of Vasudeva III,ruling in Kandahar, Vasudeva of Kabul reported possible child of Vasudeva IV,ruling in Kabul, uncertain. Chhu (c. 310? – 325?) Shaka I (c. 325 – 345) Kipunada (c. 345 – 375)
या राज्याच्या एका राजाचे चित्र उझबेकीस्तानातल्या वस्तुसंग्रहालयात आहे त्याची लिंक खाली देत आहे. हा तर पूर्ण भारतीय चेहरा आहे
सम्राट वासुदेवानतंर हे राज्याचे पुर्व आणि पश्चीम असे दोन तुकडे झाले पुढे पुर्वेचे राज्य इराणियन लोकांनी आणि पश्चीमेचे गुप्त साम्राज्याने गिळंकृत केले. आणि साधारण इसवी सनाच्या ४ शतकात हे असीम वैभवशाली राज्य लोप पावले. या सगळ्या दूर दूर पसरलेल्या राज्यांचा जो आपण आत्तापर्यंतच्या तीन लेखात विचार केला त्यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळया राज्यात व्यापार्यांानी फार मोठा सहभाग दिला आणि व्यापार्यााना फार महत्व होते. खूप वेळेला मुलुख केवळ व्यापार्यांदच्या सोयीसाठी काबिज केला जात असे त्यामूळे समाज समृध्द होता. यांनी ग्रीक,चीनी, प्राकृत,पाली या भाषात नाणी पाडली.यांचा व्यापार हा एका बाजुला रोम ते दूसर्या् बाजुला चीन पर्य़ंत चालायचा. रोमशी व्यापार करण्यासाठी त्यांनी आपल्या नावाची हुबेहुब रोमन नाणी ग्रीक आणि रोमन भाषेत पाडली होती.चीन ते रोम अशा व्यापारावर पुर्ण हुकमत कुशाणांनी बसविली होती.असे म्हणतात की या राज्याच्या बनवलेल्या वस्तु[manufactured goods] निर्यात आणि त्याबदल्यात सोने-चांदी मागणे यामुळे रोमन साम्राज्याला भीक लागायची वेळ आली होती. सम्राट कनिश्काच्या काळात हे राज्य वैभवाच्या शिखराला पोचले होते. राज्य आणि प्रजा हे दोन्ही समृध्द केवळ फ़क्टरी, नवीन शोध ,परराष्ट्रांशी चालणारा व्यापार या गोष्टींनी होतात. सुंदर रस्ते, जहाजे,दर १२मैलावर बांधलेल्या धर्मशाळा आणि व्यापाराला सशस्त्र संरक्षण ही ह्या राज्याची प्रमुख वैशीष्टे होती.वेदपठण इ.गोष्टी धर्मासाठी ठीक आहेत पण राष्ट्र संपन्न होण्यासाठी व्यापार आणि व्यापारी यांना फार मोठे महत्व आहे. याठिकाणी व्यापारामध्ये कारखाने ,उत्पादन केंद्रे या गोष्टी सुध्दा आल्या. रस्ते,विमानतळ ,बोटी,बंदरे,इ. गोष्टी या व्यापारासाठी राज्यकर्त्यांनी बांधायच्या असतात आणि व्यापार्या्नी निर्यातीने जग जिंकायचे असते. परकीय आमची विमान विद्या चोरुन गेले इ. बिनपुराव्याने वायफळ गप्पा मारण्याऎवजी आपण नवे शोध लावायचे असतात. ज्या राष्ट्रातले लोक भेदरलेपणाने आणि हताश होउन जिवंत आणि मेलेले साधू,स्वामी यांच्या द्वारी मनुष्याने आपल्या श्रमाने साध्य करावयाचे असते त्या गोष्टीसाठी रांगा लावतात अथवा प्रत्येक देवस्थानाला देवाला लाच देत काहीतरी मागत रहातात ते राष्ट्र जग व्यापाराने अथवा तलवारीने जिंकत नसते. देवाच्या द्वारी जायचे ते नितांत भक्तीने हात जोडायला,त्याच्या दिव्यतेची अनुभुती घेण्यासाठी. नोकरी,रोग,पिडा यासाठी नाही. वारकर्या,साठी चंद्रभागेच्या वाळवंटात बसुन विठ्ल्ल मंदीराच्या कळसाला हात जोडले की पंढरपुरची यात्रा संपूर्ण सफळ होते,त्याला देवासमोर जाउन देवाला लांच देण्याची आवश्यकता वाटत नाही. अथवा कूठल्यातरी फूटकळ स्वामीचा फोटो घरी,दारी,स्वैपाकघर,हाल,गाडी,कार्यालय,खिसात इ. जागी लावून भीक मागण्यात पूर्ण दिवस वर्षभर घालवावा असेही त्या भाविकाला वाटत नाही. ह्र्दयात देव ठेवावा आणि हाताने काम,तसेच मेंदूने विचार करावा. मेंदू कर्मकांडाला गहाण टाकू नये. तुकोबा पासुन ते समर्थापर्यंत सगळे संततरी वेगळे असे काय सांगून गेले आहेत.
हरवलेली हिंदु साम्रा्ज्ये अर्थात आमची इतिहासाची बेदरकारी—– लेखांक दूसरा
या लेखात आपण इंडोनेशियातल्या पहिल्या हिंदु साम्राज्याचा आढावा घेणार आहोत. त्यानंतर पुढच्या लेखात कंबोडियातल्या नंतरच्या हिंदु राजवटीचा आढावा घेउन मग पुन्हा इंडोनेशियामधल्या १३व्या शतकापर्यंतच्या इतर हिंदु राजवटींची माहीती घेऊ.
साधारण ५/६ व्या लेखापासुन मग काबूल,हिंदुकुश,बोखारा या पश्चीमेकडील राज्यातील हिंदु राजवटीचा इतिहास बघु.
इंडोनेशियातले ,कंबोडिया,मलाया,थायलंड इ.देशात अनेक हिंदु राजवटी होउन गेल्या.
कूताई साम्राज्य: इंडोनेशियातले हे सगळ्यात जुने हिंदु राज्य. याचा कालखंड साधारणपणे इसवी सनाचे ४ थ्या शतकातला आहे. अतिशय दुःखाची गोष्ट म्हणजे या राज्याचे हिंदु नाव हे फ़ुनान राज्याप्रमाणे इतिहासाला आणि आपल्याला माहीती नाही.आपल्याला सगळे वेद मुखोदगत होते पण ते वेद म्हणणारे जनसमूह आपण विसरलो.
ह्या कूताई साम्राज्याचा इतिहास हा इंडोनेशियात सापडलेल्या शिलालेख स्तंभावरून कळते.ह्या शिलालेखांना संस्कृत भाषेमधले स्तूप हे नाव आहे त्याचा अर्थही तोच आहे. हे स्तंभ मूलवर्मन नावाच्या राजाने ब्राह्मणांना दान दिले त्या निमित्त उभारले आहेत.हा इतिहास शोधणारा म्हणजे व्होगेल नावाचा पापी, तामसी,पाश्चीमात्य ज्याने १९१८ साली हा इतिहास शोधला कारण आमचे सात्वीक,पुण्यवान भारतय वेदात सगळे सगळे आहे म्हणत वेद,पूराणे कवटाळून बसले होते.
हे स्तुप संस्कृत भाषेत,भारतिय पल्लवी लिपीत आहेत.या देशाच्या मुळ राजाचे नाव कूंदुंगा होते,हे हिंदु नाव नसल्याने याने आपणहून हिंदु धर्म स्विकारला असा इतिहासकार डि कस्पारिसचा अंदाज आहे.कूंदुंगाला “नरेन्द्र” ही गौरवाची पदवी होती.त्याचा मुलगा अश्ववर्मन याला ” वंशकर्ता ” ही पदवी होती. त्याचा मुलगा मूलवर्मन ज्याने हे शिलालेख बनविले.मूलवर्मन याने अश्वमेध यज्ञ करुन आजुबाजुचे सगळे राजे जिंकल्याची शिलालेखात नोंद आहे,म्हणून याला ” राजेन्द्र’ ही पदवी होती. शिलालेखात याला “अंशुमन ” हे संबोधन आहे.
हिन्दु धर्म या बेटात इ.स.च्या दूसर्या शतकात आपल्या व्यापार्यांनी नेला असा अंदाज आहे. या साम्राज्याच्या मार्तडपूर इथे होती. याच्या खालील राजांची यादी इतिहासाला ज्ञात आहे.यांना महाराज ही पदवी होती.
1. Maharaja Kundungga, has a royal title anumerta Dewawarman
2. Maharaja Asmawarman (Kundungga’s son)
3. Maharaja Mulawarman
4. Maharaja Marawijaya Warman
5. Maharaja Gajayana Warman
6. Maharaja Tungga Warman
7. Maharaja Jayanaga Warman
8. Maharaja Nalasinga Warman
9. Maharaja Nala Parana Tungga
10. Maharaja Gadingga Warman Dewa
11. Maharaja Indra Warman Dewa
12. Maharaja Sangga Warman Dewa
13. Maharaja Candrawarman
14. Maharaja Sri Langka Dewa
15. Maharaja Guna Parana Dewa
16. Maharaja Wijaya Warman
17. Maharaja Sri Aji Dewa
18. Maharaja Mulia Putera
19. Maharaja Nala Pandita
20. Maharaja Indra Paruta Dewa
21. Maharaja Dharma Setia
या साम्राज्याचा परीघ सध्याच्या इंडोनेशियाच्या कालीमन्तन आणि जावा या बेटांवर होता.
ही सगळी राज्ये विस्मृतीत जाण्याचे मह्त्वाचे कारण म्हणजे आमच्या अंतरज्ञानी, वेदात Nuclear science to rocket सगळे काही भरलेले आहे अशी खात्री असलेल्या मूर्ख धर्ममार्तंडानी समुद्र किंबहुना पाणी ओलांडायचे नाही अशी स्वतःचा नाश करणारी धर्माज्ञा काढली.
मग काय मंत्रपठण करा,येण्यार्या परचक्राबद्दल अनभिज्ञ रहा आणि श्रावण कसा पाळावा तसेच उजव्या सोंडेचा गणपती बरा का डाव्या सोंडेचा बरा हे महत्वाचे विषय होते या समाजाला खाईत ८०० वर्षे ढकलायला. काहीच नाही तर आमचे स्वामी कसे जगाचा उध्दार करणार आहेत हा आत्म्यापर्यंत पोचणारा विषय तर कूठेच गेला नाही.
मग कूठले हिंदु साम्राज्य आणि कूठले परदेश काबीज करणे.जगातल्या सगळ्या धर्मांनी धर्मभावनेने प्रेरीत होउन साम्राज्य बनविली आणि वाढविली. फ़क्त आपणच धर्माला कर्मकांड आणि खूळचट समजूतींमध्ये बूडवुन असलेली राज्येच्या राज्ये आणि साम्राज्येच्या साम्राज्ये नुसती घालविली नाही पण विसरुन पण गेलो.
Facebook has give us lots of new Friends. One of my newest Friend on Facebook is avid fan of History (so am I) He is kind enough to allow me share his knowledgeable articles on my personal blog. Thanking you Shri. Ajit Pimpalkhare.
With this, I am glad to share with you all first one of this histoical series:
या जगात अशी हिंदु साम्राज्ये होती की कालौघात नाश पावली आणि त्यांचे नामोनिशाणही राहीले नाही.ही तर दुखाची गोष्ट आहे पण त्याहून दुखाची गोष्ट म्हणजे आपण त्या साम्राज्यांचे वारसदार त्या राज्यांचे नावही विसरलो आहोत.
या लेखमालीकेत पहील्या लेखात आपण “फ़ुनान” या राज्याचा विचार करणार आहोत. हे या राज्याचे चिनी नाव आहे कारण आपण निर्लज्ज भारतीय याचे भारतीय नाव विसरलो आहोत. हे राज्य साधारणपणे सध्याच थायलंड,मलेशिया,बोर्नीओ,कंबोडिया एवढ्या प्रदेशात पसरले होते.या राज्याचे वर्णन चिनी वकीलांनी इ.सनाच्या तिसर्या शतकात केले आहे.या राज्याची राज्यभाषा संस्कृत होती आणि त्याकाळचे संस्कृत शिलालेख मिळाले आहेत.हे राज्य इ.स. पुर्व चवथ्या शतकात अस्तित्वात आले आणि इ.स.च्या ६/७व्या शतकात नाश पावले.
इ.स. ६५८ च्या एका शिलालेखाप्रमाणे हे राज्य कौंडिण्य नावाच्या ब्राम्हणाने भावपुर नावाच्या एका गावात [हे भावपूर कंबोडियात होते] जमिनीत भाला रोवून स्थापन झाल्याचे जाहीर केले. हा भाला त्याला महाभारतातल्या द्रोणाचार्यांच्या अश्वथामा या मुलाने दिला होता.त्याने या देशातल्या नागराजा सोम याच्या नींगनीका नावाच्या मुलीशी लग्न करुन राज्याला सुरुवात केली.हा संस्कृत शिलालेख व्हीएटनामच्या हो ची मिन्ह शहरातल्या वस्तु संग्रहालयात आहे. व्हीएट्नामचे नाव चंपा होते आणि त्या राजाला चिनी भाषेत “काम्पुचीया थीपदेई अर्थात संस्कृतमध्ये “कंबोजाधिपती” ही पदवी होती त्यावरुन कंबोडियाला आज “काम्पुचिया” हे नाव आहे.
दुखाची गोष्ट म्हणजे या राजवटीच्या १८ राजांची नावे चिनी भाषेत माहिती आहे पण फक्त ४/५ राजांची खरी नावे माहीते आहेत जसा की शेवटचा राजा इ.स.५१४ ते ५४५ मध्ये रुद्रवर्मन होता त्याचे चिनी नाव Liútuóbámó होते ,यावरुन बाकिच्या राजांची खरी नावे कशी शोधणार.
ह्या राज्यात संस्कृत ही राज्यकारभाराची भाषा होती.राजाचे बरेच मंत्री हे भारतातून मागविले जात होते जसे मुस्लिम अमलात तुर्की,फ़ारसी लोक भारतात येत असत.इ.स. पुर्व ४ थ्या शतकापासुन ते इ.सनाच्या ५व्या शतकापर्यंत हिंदु हा राजधर्म होता .इ.स.च्या ५ व्या शतकात श्रीलंकेहुन आलेल्या भिक्षुंनी सगळ्यांना बुध्द धार्मिक केले.या राज्यातल्या मद्रसेन आणि समघबारा या बुध्द भिक्षुंनी बर्याच बुध्द ग्रंथाचे चिनी भाषेत भाषांतर केले.
हे राज्य अतिशय श्रीमंत होते आणि बरीच सेना बाळगुन होते. वेळप्रसंगी त्यांनी चिनी सम्राटांशी युध्द केले. या राज्याचे इंडोनेशीयातल्या शैलेंद्र राजवटीशी चांगले संबध होते.याची राजधानी उत्तर कंबोडियात व्याधपुर इथे होती फ़क्त हे व्याधपुर कुठे आहे ते इतिहासाला ज्ञात नाही.
इसवी सनाच्या सहाव्या शतकात खेमेर या दूसर्या हिंदु राजवटीचा उदय झाला आणि फ़ुनान ह्या राज्याचा नाश झाला.
दक्षीण पूर्व आशियातले हे पहीले मोठे हिन्दु राज्य होते. अर्थात आपण या राज्याचे नावही कधी ऎकले नसते. आपण मंत्र-तंत्राना वारसा समजतो पण इतिहासाचा गौरवशाली वारशाला ठोकर मारायला तयार असतो