Archive for नोव्हेंबर, 2011

कुशाण साम्राज्य — हरवलेली हिंदु साम्राज्ये,अर्थात आमची इतिहासाबद्दलची बेदरकारी — लेखांक तिसरा

हरवलेली हिंदु साम्राज्ये,अर्थात आमची इतिहासाबद्दलची बेदरकारी———–लेखांक ३

कुशाण साम्राज्य : पहिल्यांदाच माझे वाचक म्हणणार आहेत की कुशाण साम्राज्य आम्ही इतिहासाच्या पुस्तकात शिकलेले आहोत आता हा बाबा काय सांगणार आहे. पण नाही बर्‍याच प्रचलित कल्पनांना धक्का बसणार आहे. आपल्या इतिहासाच्या पुस्तकात हुण,कुशाण हे बाहेरुन आलेले आक्रमक म्हणून दिले आहेत.पण तसे नाही. हे राज्य आणि लोक चीनच्या ” जिनजियांग उघूर ” या मुस्लिम बहुवस्तीच्या प्रांतातुन ज्याची राजधानी “कशगार” ही आहे इथे उदय पावले. हे लोक पूर्णतः हिंदु होते .कशगारचे जुने नाव “काशी” होते. आजही कशगारला चीनी भाषेत “काशी” म्हणतात. जिज्ञासुसाठी मी या प्रांताच्या नकाशाची लिंक देत आहे.

लदाख, काश्मीरच्या उत्तरेला - राजधानी - कशाघर (काशी)

य़ांची भाषा ही तोखारियन[अ] आणि तोखारियन [ब] होती. ज्याची लिपी भारतीय ब्राम्ही होती. ब्राम्ही लिपी ही अफ़गाणिस्तान, पंजाब,सिंध येथे वापरली जात असे. या तोखारियन भाषा कालौघात विस्मृतीत गेल्या आणि पाश्चीमात्य संशोधकांनी शोधली आणि त्याला तुर्कि भाषेत तुर्फ़ानियन नाव होते म्हणून तोखारियन नाव दिले. तोखारियन ही भाषा संस्कृतशी फार जवळची आहे. यांची राज्यकारभाराची भाषा प्राकृत होती. प्राकृत ही भाषा जास्त करुन सिंध आणि अफ़गाणिस्तानात वापरली जात असे. आपल्या जुन्या पोथ्यात बर्‍याच वेळा मराठीचा उल्लेख प्राकृत असा होतो त्याचा आणि या भाषेचा सबंध जवळचा आहे . प्राकृत भाषा ही संस्कृतशी नाते असलेली बोलीभाषा आहे. प्राकृत हा शब्द प्रकृतः अर्थात नैसर्गीक,मूळचे या शब्दावरुन आला आहे ज्यावरुन प्रकृती हा शब्दही आला आहे तीन प्राकृत भाषा होत्या.शौरसेनी,मागधी आणि महाराष्ट्री [ज्यापासुन मराठी आली.] संस्कृत हा शब्द संस्कृतः या शब्दावरुन आला आहे ज्याचा अर्थ शुध्दीकरण केलेले,अर्क काढलेले, संस्कार केलेले ज्यावरुन संस्कृती हा शब्दही आला आहे. हे लोक सदैव चिनी सम्राटांशी लढत असत,जसे सध्याचे “सध्या चीनच्या जिनजियांग उघूर प्रांतातले लोक ” मधून मधून बंड करत असतात. ह्या राज्याच्या अस्तीत्वाचा आणि हिंदु धर्माचे उल्लेख साधारणपणे इसवी सनपूर्व दूसर्या शतकापासून मिळतात. चिनी हन राजवटीने हल्ला करुन या भागावर आपला कबजा इसवी सनपूर्व पहिल्या शतकात बसविला. कुशाण त्यानतंर दक्षीणे कडे उतरले आणि पुढच्या १०० वर्षात त्यांचे साम्राज्य अफ़गाणिस्तान,इराणचे तीन प्रांत,पाकिस्तान. पूर्ण उत्तर भारत,पंजाब,काश्मिर, ते थेट मथुरा, विदीशा, उज्जैन ते गुजराथच्या सरहद्दीपर्यंत पसरले,त्यानंतर त्यानी आक्रमण करुन त्यांचा मूळ प्रांत जो चीनचा सध्याचा जिनजियांग प्रांत तो सुध्दा जिंकुन चीनी सम्राटाला हुसकावून लावले आणि काशी अर्थात कसागर आपल्या ताब्यात आणले. या साम्राज्याचा परीघ इतका मोठा होता की त्यात सध्याचा उझबेकीस्तान,ताजिकीस्तान इ. होते.हे साम्राज्य कीती मोठे होते यासाठी याच्या नकाशाची लिंक मी खाली देत आहे.

कुशाण राज्य

कुशाण राज्य

सम्राट कनिश्काच्या काळातले राबातक शिलालेख मिळाले आहेत ज्यामध्ये कुशाणांच्या ताब्यातली शहरे दिली आहेत ती म्हणजे उज्जैन, कुंडीनपुर,साकेत कौसंबी,पाटलीपुत्र आणि चंपा. चीन मधल्या काशगर[काशी],यार्कंड आणि खोतान.इराण मधले ख्वारझेम. यांची पहिली राजधानी सध्याच्या उझबेकीस्तानातले “ऐनुतारा” हे शहर होते पुढे त्यांनी आपली राजधानी अफ़गाणिस्तानातल्या “बग्राम” [ नाव भ्रष्ट झाले पण शहराच्या नावातले ग्राम राहिले] या शहरात नेली.त्यांची हिवाळी राजधानी सध्याच्या पाकीस्तानातले “पुरुषशहर” उर्फ़ “पेशावर” इथे होती. अफ़गाणिस्तान मधल्या ” गांधार ” उर्फ़ “कंदाहार’ या प्रांतासाठी हा अक्षरशः सुवर्णकाळ होता. तसेच भारतातल्या मथुरा इथेही त्यांची राजधानी होती. हे राजे शैवपंथीय होते पण बुध्द,झरुतृष्ट,जुना ग्रीक इत्यादी धर्मांना फ़ार मोठा राजाश्रय होता.कनिष्काने पुढे बौध्द धर्म स्विकारला. यांचे गजदळ फ़ार मोठे होते,तसेच धातूविज्ञान बरेच प्रगत होते. या साम्राज्याबद्द्ल मला सर्वाधीक माहिती ताश्कंद म्युझीयमच्या catalogue मध्ये मिळाली. दुःखाची गोष्ट म्हणजे ही सगळी माहिती आपल्याला चीनी आणि नतंरच्या मुस्लिम इतिहासकारांकडून मिळते कारण इतिहास लिहिण्याच्या बाबतीत आपण लोक म्हणजे ” राम कृष्ण हरी”. या राज्याच्या राजांची जी थोडी-बहुत यादी आहे ती अशी आहे.

  • Kujula Kadphises (ca 30 – ca 80)
  • Vima Taktu or Sadashkana (ca 80 – ca 95)
  • Vima Kadphises (ca 95 – ca 127)
  • Kanishka I (ca 127 – ca 140)
  • Vāsishka (ca 140 – ca 160)
  • Huvishka (ca 160 – ca 190)
  • Vasudeva I (ca 190 – ca 230)
  • Kanishka II (c. 230 – 240)
  • Vashishka (c. 240 – 250)
  • Kanishka III (c. 250 – 275)
  • Vasudeva II (c. 275 – 310)

Vasudeva III, Vasudeva IV reported possible child of Vasudeva III,ruling in Kandahar, Vasudeva of Kabul reported possible child of Vasudeva IV,ruling in Kabul, uncertain. Chhu (c. 310? – 325?) Shaka I (c. 325 – 345) Kipunada (c. 345 – 375)

या राज्याच्या एका राजाचे चित्र उझबेकीस्तानातल्या वस्तुसंग्रहालयात आहे त्याची लिंक खाली देत आहे. हा तर पूर्ण भारतीय चेहरा आहे

सम्राट वासुदेवानतंर हे राज्याचे पुर्व आणि पश्चीम असे दोन तुकडे झाले पुढे पुर्वेचे राज्य इराणियन लोकांनी आणि पश्चीमेचे गुप्त साम्राज्याने गिळंकृत केले. आणि साधारण इसवी सनाच्या ४ शतकात हे असीम वैभवशाली राज्य लोप पावले. या सगळ्या दूर दूर पसरलेल्या राज्यांचा जो आपण आत्तापर्यंतच्या तीन लेखात विचार केला त्यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळया राज्यात व्यापार्यांानी फार मोठा सहभाग दिला आणि व्यापार्यााना फार महत्व होते. खूप वेळेला मुलुख केवळ व्यापार्यांदच्या सोयीसाठी काबिज केला जात असे त्यामूळे समाज समृध्द होता. यांनी ग्रीक,चीनी, प्राकृत,पाली या भाषात नाणी पाडली.यांचा व्यापार हा एका बाजुला रोम ते दूसर्या् बाजुला चीन पर्य़ंत चालायचा. रोमशी व्यापार करण्यासाठी त्यांनी आपल्या नावाची हुबेहुब रोमन नाणी ग्रीक आणि रोमन भाषेत पाडली होती.चीन ते रोम अशा व्यापारावर पुर्ण हुकमत कुशाणांनी बसविली होती.असे म्हणतात की या राज्याच्या बनवलेल्या वस्तु[manufactured goods] निर्यात आणि त्याबदल्यात सोने-चांदी मागणे यामुळे रोमन साम्राज्याला भीक लागायची वेळ आली होती. सम्राट कनिश्काच्या काळात हे राज्य वैभवाच्या शिखराला पोचले होते. राज्य आणि प्रजा हे दोन्ही समृध्द केवळ फ़क्टरी, नवीन शोध ,परराष्ट्रांशी चालणारा व्यापार या गोष्टींनी होतात. सुंदर रस्ते, जहाजे,दर १२मैलावर बांधलेल्या धर्मशाळा आणि व्यापाराला सशस्त्र संरक्षण ही ह्या राज्याची प्रमुख वैशीष्टे होती.वेदपठण इ.गोष्टी धर्मासाठी ठीक आहेत पण राष्ट्र संपन्न होण्यासाठी व्यापार आणि व्यापारी यांना फार मोठे महत्व आहे. याठिकाणी व्यापारामध्ये कारखाने ,उत्पादन केंद्रे या गोष्टी सुध्दा आल्या. रस्ते,विमानतळ ,बोटी,बंदरे,इ. गोष्टी या व्यापारासाठी राज्यकर्त्यांनी बांधायच्या असतात आणि व्यापार्या्नी निर्यातीने जग जिंकायचे असते. परकीय आमची विमान विद्या चोरुन गेले इ. बिनपुराव्याने वायफळ गप्पा मारण्याऎवजी आपण नवे शोध लावायचे असतात. ज्या राष्ट्रातले लोक भेदरलेपणाने आणि हताश होउन जिवंत आणि मेलेले साधू,स्वामी यांच्या द्वारी मनुष्याने आपल्या श्रमाने साध्य करावयाचे असते त्या गोष्टीसाठी रांगा लावतात अथवा प्रत्येक देवस्थानाला देवाला लाच देत काहीतरी मागत रहातात ते राष्ट्र जग व्यापाराने अथवा तलवारीने जिंकत नसते. देवाच्या द्वारी जायचे ते नितांत भक्तीने हात जोडायला,त्याच्या दिव्यतेची अनुभुती घेण्यासाठी. नोकरी,रोग,पिडा यासाठी नाही. वारकर्या,साठी चंद्रभागेच्या वाळवंटात बसुन विठ्ल्ल मंदीराच्या कळसाला हात जोडले की पंढरपुरची यात्रा संपूर्ण सफळ होते,त्याला देवासमोर जाउन देवाला लांच देण्याची आवश्यकता वाटत नाही. अथवा कूठल्यातरी फूटकळ स्वामीचा फोटो घरी,दारी,स्वैपाकघर,हाल,गाडी,का​र्यालय,खिसात इ. जागी लावून भीक मागण्यात पूर्ण दिवस वर्षभर घालवावा असेही त्या भाविकाला वाटत नाही. ह्र्दयात देव ठेवावा आणि हाताने काम,तसेच मेंदूने विचार करावा. मेंदू कर्मकांडाला गहाण टाकू नये. तुकोबा पासुन ते समर्थापर्यंत सगळे संततरी वेगळे असे काय सांगून गेले आहेत.

(श्री अजित पिंपळखरे यांच्या परवानगीने)