हलक्या पावलांनी येते संध्याकाळ
मग ती ही येते
शंकराच्या जटांवर
शामल ललाटावर
लालिमा आकर्षक करायला क्षितिजावर
येते ही नाजुक चंद्राची कोर
दिनकराच्या अस्तानंतर
रात्रीच्या कालपटलावर
सौंदर्य खुलवण्यासाठी येते
प्रतिपदेची ही रेखीव चंद्रकोर
@विभासा
20 सप्टेंबर
हलक्या पावलांनी येते संध्याकाळ
मग ती ही येते
शंकराच्या जटांवर
शामल ललाटावर
लालिमा आकर्षक करायला क्षितिजावर
येते ही नाजुक चंद्राची कोर
दिनकराच्या अस्तानंतर
रात्रीच्या कालपटलावर
सौंदर्य खुलवण्यासाठी येते
प्रतिपदेची ही रेखीव चंद्रकोर
@विभासा
26 ऑगस्ट
अशीच एक मस्त हवेशीर दुपार
पांढरे ढग अन् निळे आकाश समोर
येईल मग हळुच एक फुलपाखरू
पंखांची नाजूक हालचाल करत
इवलेसे हे पंख नितळ काळे
वर हलकेच शिंपडले ठिपके पिवळे
वाऱ्यावर तरंगत सुप्त दडली ओढ जोपासते
पाना पानावर कळी कळीवर टिपून बघते
कसं कळतं त्या चिमुकल्या जीवा
कुठे आहे मधाचा मेवा
कसा राहतो लक्षात त्याच्या
या इमारतीचा तोच मजला बारा
पाऊस पडतो कडक उन पडते
कामाचे फोन चालतात तास तास
पण तो एक क्षण मात्र येतो
मुक्या जीवाची जीवनाची क्षणभंगुरता
हलकेच मनः पटलावर रेखाटून जातो
नसेन उद्या मी जरी
तरी ही संपणार नाही
आहे आनंद एवढा त्या क्षणात
@विभासा
12 ऑगस्ट

माखन चोर माखन चोर
नाही बरे हा मिश्किल ।
स्वारी आहे आनंदात
नाव तयाचे शर्विल ॥ १ ॥
आईने अंथरले मऊ मऊ दुपटे
बाबानी दिली लाल टोपी खास ।
आजोबानी आणली गोड बासरी
आजीने खोचले हळुच मोराचे पिस ॥ २ ॥
दिसतो निरागस डोळा
मोठा लोण्याचा गोळा ।
उमटती बाल मनात भाव
घेतील उज्ज्वल भविष्याचा ठाव ॥ ३ ॥
@विभासा