
ऋग्वेदात गायत्री मंत्र सुंस्कृत भाषेत लिहिला आहे.
महावाक्यांचे मूळ हे वेद आणि उपनिषेदत आहे. त्याबद्दल संक्षिप्त स्वरूपात माहिती देत आहे.
वेद विश्वाच्या उत्पतीचा आधीपासून ध्वनिलहरींच्या स्वरूपात अस्थित्वात आहेत. पूर्वकालीन महान ऋषींनी सुमारे ३५०० वर्षांपूर्वी, तपश्चर्येने वेदांच्या विशिष्ट्य ध्वनिलहरीचें शब्दब्रह्मन केले. त्याला ‘अनंता वै वेदा’ असे म्हंटले गेले. ‘विद’ पासून वेद हा शब्द प्रचलित झाला , त्याचा अर्थ, विश्वाचे ज्ञान प्राप्त करणे. विश्वामित्र ऋषींनी गायत्री मंत्राचे शब्दब्रह्मन केले, राजा अघोराने रुद्राचे शब्दब्रह्मन केले. पुढे काही शतके ज्ञानी ऋषीनी त्यांच्या शिष्याना वेदांचे पाठांतरातुन ज्ञान दिले.वेदांचे प्रस्तुतीकरण भजने,पठण व लिखाणात होते.शेकडो वर्षे हि परंपरा चालत होती .
संस्कृत भाषा ही वेदांची निर्मिती आहे.
महर्षी व्यासांबद्दल थोडक्यात माहिती खालीलप्रमाणे.
हिंदुधर्मशाश्त्रानुसार, महर्षी व्यासच्या आधी २८ व्यास होते . महर्षी व्यासाचा जन्म त्रेता युगात [साधारण २३००-२५०० वर्षांपूर्वी ] झाला असे मानले जाते. व्यास चिरंजीवी होते कारण ते त्रेता युगात जन्मले,संपूर्ण द्वापारयुग अनुभवले व काली युगाच्या सुरवातीच्या काळापर्यंत जीवित होते. त्यांचे वडीलांचे नाव पराशर ऋषी व आईचे नाव सत्यवतीदेवी होते.
महर्षी व्यासांचा जन्म उत्तर प्रदेशातील कालपी येथे झाला.तेथे त्याच्या नावे कालपी मंदिर आहे. पराशरऋषी हे उत्तम जोशिष्यशास्त्र जाणत. पराशरस्मृती नावाचे वैदिक संग्रहाचा ग्रंथ आहेत. ते ग्रंथआजचे समाज व्यवस्थेवर अभ्यास करणारे सवशोधक नेहमीच वापरतात .
महर्षी व्यासांनी लहानपणी आई वडीलां समोर जंगलात अखंड तपश्चर्या करण्याची इच्छा व्यक्त केली. पुराणातील कथेनुसार महर्षी व्यासांचे गुरु वासुदेव,तसेच धर्मशाश्त्राचे शिक्षण त्यांनी गुरु सनाका व गुरु सदानंद यांचे कडून घेतले.
निरनिराळ्या शाश्त्रांत पारंगत होऊन पुढे महर्षी व्यासांनी हिंदू धर्म दिशा देणारेअसे लिखाण केले. वेदांचे सविस्तर व बांधेसुद विवेचन केले. श्रुतींचा अर्थ सर्वसामान्यांना कळेल असे ५५५ ब्रह्मसूत्रे , १८ पुराणे व महाभारतासारखे [५वा वेद ] ग्रंथ विवेचन केले. महर्षी व्यास हे स्वतः महाभारतांतील एक महत्वाचे पात्र आहेत. विदुर, पांडू आणि धृतराष्ट्र ह्याचे पितामहा महर्षी व्यास होते.
सगळे ग्रंथ श्री. गणेशाला विनंती करून त्याच्या कडून लिहून घेतले.
अंकोर वाट, कंबोडिया येथील १००० वर्षपूर्वीच्या भव्य मंदिरातील कोरीवकाम. महर्षी व्यास आणि गणेशा कडून लिखाण करून घेताना.


महर्षी व्यास आणि आदी शंकराचार्यांची भेटअचानक गंगेकिनारी झाली. त्या दोघांत ब्रह्मसूत्रे व अद्वैत वेदांत विषयावर चर्चा झाली. महर्षी व्यास आदी शंकराचार्याच्या ब्रह्मसूत्रांच्या आकलनावर बेहद खुश झाले व त्यांनी हे ज्ञान सर्व भारतात पसरविण्यास शंकराचार्यांना विनंती केली. अश्या रीतीने आदी शंकराचार्यांना स्पुर्ती मिळाली व त्या उद्देशाने त्यांनी भारतात प्रवास केला.धर्मशाश्त्रानुसार महर्षी व्यास हे विष्णूचा अवतार आहेत. .
महर्षी व्यासांची प्रखर तपश्चर्या, तेजस्वी बुद्धिमत्ता व हिंदू धर्माला दिशा दाखविणाचे महान कार्य , या कारणास्तव ते गुरूंचे गुरु ठरले आहेत. हिंदू कॅलेंडर प्रमाणे, आषाढ महिन्यातील पूर्णिमा व्यासपूर्णिमा तसेच गुरुपूर्णिमा साजरी केली जाते. धर्मशाश्त्र असे सांगते कि त्या दिवशी महर्षी व्यासाचा जन्म झाला व त्यांनी वेद लिखाण पूर्ण करून घेतले.
हिंदू धर्माचा ग्रंथ भागवत गीता नसून वेदआहेत.
महर्षी व्यासांचे अत्यंत तेजस्वी व्यक्तिमत्व बद्दल माहिती , वेद आणि उपनिषद ह्यांचा उगम कोठून व कसा झाला ह्याची थोडक्यात माहिती पाहिली.
त्यानंतर ४ ब्रम्ह्यवाक्यांची माहिती घेऊ.
वेदांत ह्या शब्दांत वेद+अंत असे २ शब्द सामावलेले आहेत.
म्हणजेच वेदांचे सार आणि तात्पर्य तीच उपनिषेद होत. साधारण २००-३०० उपनिषेद ,असून त्यातील १० महत्वाची म्हणून मानली जातात.
ती अशी.
[१] ऐतरेय [२] ईशावास [३] तैतरीय [४] मैत्रायणी [५] कठो [६] किनो [७] चांडोग्य [८] मुण्डक [९] मंडोक्य [१०] बृहधारण्या
उपनिषेदाने भारतीय हिंदू संस्कृतीच्या विकासाचा मजबूत पाया उभारला.
अद्वैतउपनिषदात ४ महावाक्याचे विवेचन केले आहे. ती वाक्ये व त्यांचे थोडक्यात विवेचन खालीलप्रमाणे आहे.
[१] प्रज्ञानम् ब्रह्म | [ ऐतरेय उपनिषेद,३.३ ऋगवेद ]
ब्रह्म हे परिपूर्ण असून विश्वात सर्व ठिकाणी वास्तव करत आहे. त्याचे अस्थित्व सदाच ते ब्रह्माण्डापासुन ते लहानात लहान जिवाणूत वास्तव करते,ते सर्व ठिकाणी असल्याने साहजिकच प्रत्येक मानवात वास करते.
रामकृष्ण परमहंस यांचा गुरुमंत्र ” जीव तेथे शिव”.
[२]अयम् आत्मा ब्रह्म | [मांडूक्य उपनिषद, १.२ अथर्ववेद ]
आत्मा हा परमात्माचा अंश आहे कि ज्याचे अस्थित्व मानवाच्या ज्ञानाच्या व विचारांच्या पलीकडे , विश्वातील अथांग आकाशात तो पसरलेला आहे. परमात्मा हा चेतना शक्तीचे उगमस्थान असून त्याला काळ-वेळाचे,बाह्य विषयांचे कोठलेही बंधन नाही. आत्मा आणि परमात्मा जोडण्याची कोठलीही क्रिया नसून सर्वाथाने दोघेही एकाच आहेत. परमात्मा उच्चत्तम ज्ञानाने पूर्वत्व असून,आत्मा त्याचा अविभाज्य अंग आहे.
[3] तत् त्वम् असि | [चांडोग्य उपनिषद,६.८. ७ सामवेद ]
उड्डालाक [पिता व गुरु] आणि श्वेतकेतु [पुत्र व शिष्य] यांच्यामध्ये झालेल्या संवादाचे वर्णन आहे. श्वेतकेतु १२ वर्षे आध्यत्मिक शिक्षण घेऊन घरी परततो. त्याचे पिता त्याला विचारतात ” पुत्र तुला एवढा गर्व का? तो हे शिकलास का?शिक्षण म्हणजे जे न ऐकलेले ऐकणे,माहित नसल्याचे ज्ञान होणे ,तसेच विवेकी ज्ञान सतत वाढविणे.” ” ते कसे?”श्वेतकेतु प्रश्न विचारतो. “जसा प्राण्याचा हंडा हा मातीपासून बनविला जातो,माती ही मूळ आहे.त्याचे वेगळे प्रकार व नवे असतील पण शेवटी ती माती आहे. सोन्याचे विविध अलंकार बनतात व त्याला विविध नावे असतात, पण मूळ सोनेच आहे. ज्याला मूळ विषयाचे ज्ञान आहे, त्याला त्याचा विविध परिणामांचे ज्ञान प्राप्त होते, कारण मूळ स्वरूप आणि परिणाम ह्या विविध नसून एकच आहेत ” उड्डालाक पुढे सांगतात ” तुला जर परमात्म्याचे ज्ञान प्राप्त झाले तर सर्वे विश्वाचे ज्ञान प्रताप होईल”. त्यापुढे उड्डालाक अतिशय सोप्या भाषेत शब्दांची फोड करतात ” तत् म्हणजे परमात्मा त्वम म्हणजे आत्मा जो जीवात स्थानापन्न आहे तो, असी म्हणजे दोघांतली समानता होय. तात्पर्य आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे.”
[४]अहम् ब्रह्म अस्मि | [ब्रहदारण्यक उपनिषद ,१. ४. १० यजुर्वेद ]
अहम् = मी, स्वतःबद्दल असलेला अभिमान किंवा अहंकार.
मी कोणीच नाही हे स्वतःला पटवून द्यायलाही अभिमानाची गरज असतेच.
ब्रह्म= सर्वशक्तिमान,सर्वज्ञानी ,सर्वव्याप्ती , शक्ती की जी सर्व ब्रह्मांडच असते इतकेच नव्हे तर ईश्वर सुद्धा निर्मिती करते.
अस्मि= मीपणाचा भाव, अस्तित्वाची जाणीव व ती टिकवणाचा संकल्प. सर्वप्रथम प्रत्येकाला स्वतःच्या अस्थिवताची जाणीव
दृढतेने असणे आवश्यक आहे. स्वतःला कोठल्याही दृष्टीने,कारणाने ,इतरांच्या मतानुसार, तुच्छ ,हीन व कमी लेखता
काम नये. हि एक आत्मघातकी वृत्ती आहे व आपल्या अस्थित्वाविषयी द्वेष निर्माण करते.
प्रत्येक व्यक्तित सर्व काही करण्याची दैवी शक्ति विद्यमान असते. सर्वजण शक्तिमान ब्रह्माचे अंश आहोत.
महर्षी व्यास, महर्षी आदिशंकराचार्य यांनी महावाक्यांची सुरेख फोड करून ती कथन केली आहे.
तात्पर्य : मानव हा स्वयं प्रभूं आहे. मानवाने आपल्या व्यक्तित्वाला महत्व दिले पाहिजे, आत्मनिर्भरतेवर विश्वास ठेवला पाहिजे.
“जुना धर्म म्हणत असे की ज्याचा धर्मावर विश्वास नाही तो नास्तिक. नवा धर्म म्हणतो कि ज्याचा स्वःतावर विश्वास नाही तो नास्तिक.” स्वामी विवेकानंद
लेखन: राजेंद्र धर्माधिकारी , २३ ऑक्टोबर २०२०