हरवलेली हिंदु साम्रा्ज्ये अर्थात आमची इतिहासाची बेदरकारी—– लेखांक दूसरा
या लेखात आपण इंडोनेशियातल्या पहिल्या हिंदु साम्राज्याचा आढावा घेणार आहोत. त्यानंतर पुढच्या लेखात कंबोडियातल्या नंतरच्या हिंदु राजवटीचा आढावा घेउन मग पुन्हा इंडोनेशियामधल्या १३व्या शतकापर्यंतच्या इतर हिंदु राजवटींची माहीती घेऊ.
साधारण ५/६ व्या लेखापासुन मग काबूल,हिंदुकुश,बोखारा या पश्चीमेकडील राज्यातील हिंदु राजवटीचा इतिहास बघु.
इंडोनेशियातले ,कंबोडिया,मलाया,थायलंड इ.देशात अनेक हिंदु राजवटी होउन गेल्या.
कूताई साम्राज्य: इंडोनेशियातले हे सगळ्यात जुने हिंदु राज्य. याचा कालखंड साधारणपणे इसवी सनाचे ४ थ्या शतकातला आहे. अतिशय दुःखाची गोष्ट म्हणजे या राज्याचे हिंदु नाव हे फ़ुनान राज्याप्रमाणे इतिहासाला आणि आपल्याला माहीती नाही.आपल्याला सगळे वेद मुखोदगत होते पण ते वेद म्हणणारे जनसमूह आपण विसरलो.
ह्या कूताई साम्राज्याचा इतिहास हा इंडोनेशियात सापडलेल्या शिलालेख स्तंभावरून कळते.ह्या शिलालेखांना संस्कृत भाषेमधले स्तूप हे नाव आहे त्याचा अर्थही तोच आहे. हे स्तंभ मूलवर्मन नावाच्या राजाने ब्राह्मणांना दान दिले त्या निमित्त उभारले आहेत.हा इतिहास शोधणारा म्हणजे व्होगेल नावाचा पापी, तामसी,पाश्चीमात्य ज्याने १९१८ साली हा इतिहास शोधला कारण आमचे सात्वीक,पुण्यवान भारतय वेदात सगळे सगळे आहे म्हणत वेद,पूराणे कवटाळून बसले होते.
हे स्तुप संस्कृत भाषेत,भारतिय पल्लवी लिपीत आहेत.या देशाच्या मुळ राजाचे नाव कूंदुंगा होते,हे हिंदु नाव नसल्याने याने आपणहून हिंदु धर्म स्विकारला असा इतिहासकार डि कस्पारिसचा अंदाज आहे.कूंदुंगाला “नरेन्द्र” ही गौरवाची पदवी होती.त्याचा मुलगा अश्ववर्मन याला ” वंशकर्ता ” ही पदवी होती. त्याचा मुलगा मूलवर्मन ज्याने हे शिलालेख बनविले.मूलवर्मन याने अश्वमेध यज्ञ करुन आजुबाजुचे सगळे राजे जिंकल्याची शिलालेखात नोंद आहे,म्हणून याला ” राजेन्द्र’ ही पदवी होती. शिलालेखात याला “अंशुमन ” हे संबोधन आहे.
हिन्दु धर्म या बेटात इ.स.च्या दूसर्या शतकात आपल्या व्यापार्यांनी नेला असा अंदाज आहे. या साम्राज्याच्या मार्तडपूर इथे होती. याच्या खालील राजांची यादी इतिहासाला ज्ञात आहे.यांना महाराज ही पदवी होती.
1. Maharaja Kundungga, has a royal title anumerta Dewawarman
2. Maharaja Asmawarman (Kundungga’s son)
3. Maharaja Mulawarman
4. Maharaja Marawijaya Warman
5. Maharaja Gajayana Warman
6. Maharaja Tungga Warman
7. Maharaja Jayanaga Warman
8. Maharaja Nalasinga Warman
9. Maharaja Nala Parana Tungga
10. Maharaja Gadingga Warman Dewa
11. Maharaja Indra Warman Dewa
12. Maharaja Sangga Warman Dewa
13. Maharaja Candrawarman
14. Maharaja Sri Langka Dewa
15. Maharaja Guna Parana Dewa
16. Maharaja Wijaya Warman
17. Maharaja Sri Aji Dewa
18. Maharaja Mulia Putera
19. Maharaja Nala Pandita
20. Maharaja Indra Paruta Dewa
21. Maharaja Dharma Setia
या साम्राज्याचा परीघ सध्याच्या इंडोनेशियाच्या कालीमन्तन आणि जावा या बेटांवर होता.
ही सगळी राज्ये विस्मृतीत जाण्याचे मह्त्वाचे कारण म्हणजे आमच्या अंतरज्ञानी, वेदात Nuclear science to rocket सगळे काही भरलेले आहे अशी खात्री असलेल्या मूर्ख धर्ममार्तंडानी समुद्र किंबहुना पाणी ओलांडायचे नाही अशी स्वतःचा नाश करणारी धर्माज्ञा काढली.
मग काय मंत्रपठण करा,येण्यार्या परचक्राबद्दल अनभिज्ञ रहा आणि श्रावण कसा पाळावा तसेच उजव्या सोंडेचा गणपती बरा का डाव्या सोंडेचा बरा हे महत्वाचे विषय होते या समाजाला खाईत ८०० वर्षे ढकलायला. काहीच नाही तर आमचे स्वामी कसे जगाचा उध्दार करणार आहेत हा आत्म्यापर्यंत पोचणारा विषय तर कूठेच गेला नाही.
मग कूठले हिंदु साम्राज्य आणि कूठले परदेश काबीज करणे.जगातल्या सगळ्या धर्मांनी धर्मभावनेने प्रेरीत होउन साम्राज्य बनविली आणि वाढविली. फ़क्त आपणच धर्माला कर्मकांड आणि खूळचट समजूतींमध्ये बूडवुन असलेली राज्येच्या राज्ये आणि साम्राज्येच्या साम्राज्ये नुसती घालविली नाही पण विसरुन पण गेलो.
(श्री अजित पिंपळखरे यांच्या परवानगीने)