“फ़ुनान” चे राज्य — हरवलेली हिंदु साम्रा्ज्ये अर्थात आमची इतिहासाची बेदरकारी — लेखांक पहिला

Facebook has give us lots of new Friends. One of my newest Friend on Facebook is avid fan of History (so am I) He is kind enough to allow me share his knowledgeable articles on my personal blog. Thanking you Shri. Ajit Pimpalkhare.
With this, I am glad to share with you all first one of this histoical series:
या जगात अशी हिंदु साम्राज्ये होती की कालौघात नाश पावली आणि त्यांचे नामोनिशाणही राहीले नाही.ही तर दुखाची गोष्ट आहे पण त्याहून दुखाची गोष्ट म्हणजे आपण त्या साम्राज्यांचे वारसदार त्या राज्यांचे नावही विसरलो आहोत.

या लेखमालीकेत पहील्या लेखात आपण “फ़ुनान” या राज्याचा विचार करणार आहोत. हे या राज्याचे चिनी नाव आहे कारण आपण निर्लज्ज भारतीय याचे भारतीय नाव विसरलो आहोत. हे राज्य साधारणपणे सध्याच थायलंड,मलेशिया,बोर्नीओ,कंबोडिय​ा एवढ्या प्रदेशात पसरले होते.या राज्याचे वर्णन चिनी वकीलांनी इ.सनाच्या तिसर्‍या शतकात केले आहे.या राज्याची राज्यभाषा संस्कृत होती आणि त्याकाळचे संस्कृत शिलालेख मिळाले आहेत.हे राज्य इ.स. पुर्व चवथ्या शतकात अस्तित्वात आले आणि इ.स.च्या ६/७व्या शतकात नाश पावले.

इ.स. ६५८ च्या एका शिलालेखाप्रमाणे हे राज्य कौंडिण्य नावाच्या ब्राम्हणाने भावपुर नावाच्या एका गावात [हे भावपूर कंबोडियात होते] जमिनीत भाला रोवून स्थापन झाल्याचे जाहीर केले. हा भाला त्याला महाभारतातल्या द्रोणाचार्यांच्या अश्वथामा या मुलाने दिला होता.त्याने या देशातल्या नागराजा सोम याच्या नींगनीका नावाच्या मुलीशी लग्न करुन राज्याला सुरुवात केली.हा संस्कृत शिलालेख व्हीएटनामच्या हो ची मिन्ह शहरातल्या वस्तु संग्रहालयात आहे. व्हीएट्नामचे नाव चंपा होते आणि त्या राजाला चिनी भाषेत “काम्पुचीया थीपदेई अर्थात संस्कृतमध्ये “कंबोजाधिपती” ही पदवी होती त्यावरुन कंबोडियाला आज “काम्पुचिया” हे नाव आहे.

दुखाची गोष्ट म्हणजे या राजवटीच्या १८ राजांची नावे चिनी भाषेत माहिती आहे पण फक्त ४/५ राजांची खरी नावे माहीते आहेत जसा की शेवटचा राजा इ.स.५१४ ते ५४५ मध्ये रुद्रवर्मन होता त्याचे चिनी नाव Liútuóbámó होते ,यावरुन बाकिच्या राजांची खरी नावे कशी शोधणार.

ह्या राज्यात संस्कृत ही राज्यकारभाराची भाषा होती.राजाचे बरेच मंत्री हे भारतातून मागविले जात होते जसे मुस्लिम अमलात तुर्की,फ़ारसी लोक भारतात येत असत.इ.स. पुर्व ४ थ्या शतकापासुन ते इ.सनाच्या ५व्या शतकापर्यंत हिंदु हा राजधर्म होता .इ.स.च्या ५ व्या शतकात श्रीलंकेहुन आलेल्या भिक्षुंनी सगळ्यांना बुध्द धार्मिक केले.या राज्यातल्या मद्रसेन आणि समघबारा या बुध्द भिक्षुंनी बर्‍याच बुध्द ग्रंथाचे चिनी भाषेत भाषांतर केले.

हे राज्य अतिशय श्रीमंत होते आणि बरीच सेना बाळगुन होते. वेळप्रसंगी त्यांनी चिनी सम्राटांशी युध्द केले. या राज्याचे इंडोनेशीयातल्या शैलेंद्र राजवटीशी चांगले संबध होते.याची राजधानी उत्तर कंबोडियात व्याधपुर इथे होती फ़क्त हे व्याधपुर कुठे आहे ते इतिहासाला ज्ञात नाही.

इसवी सनाच्या सहाव्या शतकात खेमेर या दूसर्‍या हिंदु राजवटीचा उदय झाला आणि फ़ुनान ह्या राज्याचा नाश झाला.

दक्षीण पूर्व आशियातले हे पहीले मोठे हिन्दु राज्य होते. अर्थात आपण या राज्याचे नावही कधी ऎकले नसते. आपण मंत्र-तंत्राना वारसा समजतो पण इतिहासाचा गौरवशाली वारशाला ठोकर मारायला तयार असतो

तेंव्हा वाचा आणि यावर विचार करा.

(श्री अजित पिंपळखरे यांच्या परवानगीने)

यावर आपले मत नोंदवा