
चित्र संदर्भ: कंजूस माणूस
चित्र संदर्भ: टेलिंग लाईज्
वेदला कविता, गाणी, श्लोक अगदी पटापट पाठ होत. आजी आजोबा त्याला रोज नवीन नवीन गाणी, श्लोक शिकवीत आणि वेद ती पटकन पाठ करून म्हणून दाखवत असे. आजूबाजूला रहाणारे शेजारी, नातेवाईक सगळे वेदचे कौतुक करत असत.
वेदच्या इमारतीत एक आजोबांचे मित्र रहात होते. त्यांना सर्वजण तात्या म्हणत असत. अतिशय कंजूष अशी तात्यांची ख्याती होती सोसायटी मध्ये. त्यांचा नातू अंबर, वेदचा चांगला मित्र होता. वेद त्यांच्याकडे नेहमी खेळायला जात असे. अंबरच्या घरी गेला की तात्या वेदला नेहमी कविता, गाणी म्हणायला लावत आणि चॉकलेट किंवा बक्षीस कबूल करत. पण गाणं म्हणून झालं की नुसती शाबासकी देऊन बोळवण करत. वेदला या गोष्टीचा खूप राग येत असे.
त्या दिवशी पुन्हा असेच घडले. आता मात्र वेद फार चिडला. पण तात्यांना कसे काय बोलणार? वेद विचार करत घरी आला.
नेहमी प्रमाणे रात्री आजोबांजवळ झोपायला गेला. आजोबांनी त्याला त्या रात्री अकबर बिरबलाची नवीन गोष्ट सांगितली. त्यामध्ये बिरबलाने कंजूष माणसाची कशी जिरवली हे सांगितले होते. वेदच्या डोक्यात एक कल्पना आली आणि मनातल्या मनात विचार करत हसत वेद झोपी गेला.
दुसऱ्या दिवशी अंबर कडे खेळायला गेला असताना तात्या आजोबांनी त्याला हाक मारली
“वेद, एक कविता म्हणून दाखव तुला बक्षिस देतो”
वेदने एक छानशी कविता त्यांना ऐकवली. वेदने बक्षीस मागितले.
“अरे वेद, मी तुला फक्त खूष करण्यासाठी म्हटले होते बक्षीस देतो म्हणून. छान म्हटलीस कविता”, तात्या म्हणाले.
“आजोबा आज संध्याकाळी आमच्या घरी या. आमच्या आज घरी वडापावचा बेतआहे. तुम्हाला खूष करतो”, जाता जाता वेद तात्या आजोबांना म्हटला.
“नक्की येतो बाळा”, तात्या म्हणाले.
संध्याकाळी तात्या वेदच्या घरी पोहचले. मस्त खमंग वास येत होता स्वयंपाक घरातून. खरेतर वेदच्या घरात कोणीच नव्हते आणि आईने वेदसाठी तळून ठेवले होते. म्हणून वेदने अंबर आणि तात्यांना घरी बोलावले होते. तात्यांच्या तोंडाला पाणी सुटले होते. वडापाव कधी येतो याची वाट बघत होते.
“अरे बाळा घरी कोणीच नाही का? ते वडापावचे काय झाले?”, तात्या वेदला म्हणाले
“अहो, आजोबा आज घरी कोणीच नाही, मी तुम्हाला असेच खूष करण्यासाठी बोलावले होते”, वेद हसत म्हणाला #मा_आ_वि #बिरबल #अकबर
Tweet
तात्यांना जे समजायचे समजले आणि त्यांनी पुन्हा कधी वेदला खोटे वचन दिले नाही.
तात्पर्य: कधीही खोटे बोलू नये आणि कुणाला दुखवू नये!
Posted by manasi godbole on ऑक्टोबर 16, 2020 at 9:19 pm
फारच छान गोष्ट आहे
लहान मुलं किती पटकन निरीक्षण करून वागतात आणि त्यांच्यासमोर आपलीच चूक आपल्याला कशी तोंडघाशी पडते याचे उत्तम उदाहरण
जशास तसे किंवा पेरावे तसे उगवते या म्हणी अगदी शोभून दिसतील या गोष्टीला
LikeLiked by 1 person
Posted by amit951 on ऑक्टोबर 17, 2020 at 4:42 सकाळी
दिले वचन कधी मोडू नये, मुख्यत्वे पालकांनी! आई वडील लहान मुलांचे आदर्श असतात आणि ते नकळत त्यांचे अनुकरण करत असतात. मुलांबाबत ऊक्तिपेक्षा कृतीच श्रेष्ठ आणि जास्त प्रभावशाली ठरते.
LikeLike
Posted by Nikhilesh Godbole on ऑक्टोबर 25, 2020 at 3:05 सकाळी
छान
LikeLike