रामरक्षा

रामरक्षा

रोजच्या जीवनातील कुठल्याही प्रहरी रामरक्षा म्हंटली तरी प्रचंड प्रमाणात ऊर्जा तयार होते. जी स्पंदने रामरक्षेतून जागृत होतात, ती दाखविण्यासाठी कुठलाही चश्मा किंवा भींग उपलब्ध नाही, परंतु “स्वानुभव” ह्या एकमेव साधनातून याची प्रचिती येते.

आत्तसज्जधनुषा विषुस्पृशा वक्षया शुगनिषङ्ग सङि‌गनौ ।
रक्षणाय मम रामलक्ष्मणा वग्रत: पथि सदैव गच्छताम् ॥२०॥

– रामरक्षा स्तोत्र

हा श्र्लोक म्हणताना अंगावर उभा राहणारा काटा अनुभवण्यासारखा असतो. (पूर्ण रामरक्षा येथे मांडली आहे किंवा विकिपीडियावर ही सापडेल)

घरात एकटे आहात, रामरक्षा म्हणा,
कुणी आजारी आहे, त्याच्या बाजूला बसून रामरक्षा म्हणा,
प्रवासात आहात, रामरक्षा म्हणा,
रस्त्यावरुन एकटे जात आहात, रामरक्षा म्हणा,
पहिल्यांदाच प्रेजेंटेशन देणार आहात, रामरक्षा म्हणा,
नविन देशात अनोळखी लोकांच्यात आहात, रामरक्षा म्हणा…

कुठल्याही संकटात असाल,
फारच निगेटिव वाटतंय,
आपल्या आवडत्या व्यक्तिशी भांडण झालंय,
खूप वाईट वाटतंय,
रडायला येतंय,
एकटं वाटतंय,

रामरक्षा म्हणा…

कुठल्याही प्रकारचं डिप्रेशन तुम्हाला कधीच येणार नाही. आत्महत्येचे विचार मनाला शीवणार नाहीत..आस्तिक असाल, नास्तिक असाल तरीही रामरक्षा म्हणा. देवावर नसेल विश्वास पण विज्ञानवर असेल तोच रामरक्षेवर ठेवा.

मोबाईल वर ऐकत असाल तरीही तोंडाने म्हणा. चारचौघात असाल तरीही मध्यमेतून म्हणा. रामरक्षा असा एक रामबाण उपाय आहे जो तुमचे बारा कधीच वाजू देणार नाही.

पटत नसेल तर आजपासून अनुभव घ्यायला सुरुवात करा.

तुम्हाला रामरक्षा म्हणून काही अनुभव आला आहे का?

प्रत्येकाला अनुभव येईलच असे नाही आणि आला तरी तो पूर्ण जाणवेल असे नाही. पण जेव्हा अनुभव येतो आणि जाणवतो तो आंतरिक शक्ति देऊन जातो. असा अनुभव खाली कमेन्ट मध्ये नक्की लिहा

।। श्रीराम जय राम जय जय राम।।

@सौ मानसी निखिलेश गोडबोले

9 responses to this post.

  1. Vrushali Yeolekar's avatar

    Posted by Vrushali Yeolekar on सप्टेंबर 20, 2020 at 3:52 pm

    लहानपणी परवाचा म्हणणे हा संस्कार कालांतराने आणि कामाच्या बदलेल्या स्वरूपामुळे मागे पडला, आणि पूर्वी तोंडपाठ असलेली स्तोत्रे आता मध्ये मध्ये अडखळायला लागल्यावर मात्र पुन्हा एकदा परवाचा म्हणण्याची गरज भासू लागली. सध्याच्या एकंदरीत तणावाच्या आयुष्यात मला तरी रामरक्षा खरंच माझ्या मनाची रक्षा करते आसा प्रत्यय आला आहे. घरामध्ये काम करताना रामरक्षा म्हणाली की मनामध्ये कुठलेच नकारात्मक विचार येत नाहीत आणि करत असलेलं काम मन लावून केलं जात. आणि मोठ्यांदा म्हणाल्यामुळे घरात पण सकारात्मक ऊर्जा तयार होते.

    Like

    उत्तर द्या

    • manasi godbole's avatar

      Posted by manasi godbole on सप्टेंबर 20, 2020 at 5:12 pm

      खरंच, मन करा रे प्रसन्न
      सर्व सिद्धींचे कारण,
      आता जे म्हणतात ते मन प्रसन्न करण्यासाठी सर्वात ऊर्जा दायक आणि उत्तम गोष्ट म्हणजे रामरक्षा पठण

      Like

      उत्तर द्या

  2. Sonali Deolekar's avatar

    खूप छान माहिती मिळाली…मनापासून आणि आर्ततेने दिलेली हाक, श्रद्धेने म्हंटलेले कोणतेही श्लोक, स्तोत्र त्या ईश्वरा चरणी पोहोचतेच आणि त्याची प्रचिती येतेच

    Liked by 1 person

    उत्तर द्या

  3. मधुरा's avatar

    Posted by मधुरा on सप्टेंबर 20, 2020 at 5:35 pm

    आम्ही ही रोज रामरक्षा म्हणतो संध्याकाळी. प्रसन्न वाटत. मनातील भीती निघून जाते.
    संकटे येतात आणि जातात पण त्यात भक्कमपणे उभ राहायला रामरक्षेचा आहात आहे.

    Like

    उत्तर द्या

    • manasi godbole's avatar

      Posted by manasi godbole on सप्टेंबर 20, 2020 at 8:14 pm

      धन्यवाद.
      अगदी खरं आहे मनाला शांत आणि प्रसन्न करायला खूप मदत होते रामरक्षा पठणामुळे. तसंच कुठल्याही प्रकारची भीती संभ्रम सर्वकाही दूर पळून जातं.

      Like

      उत्तर द्या

  4. vivekneetu2002's avatar

    Posted by vivekneetu2002 on सप्टेंबर 20, 2020 at 9:48 pm

    माता रामो मत्पिता रामचन्द्रः स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः । ..ह्या ओळी माझे ऊर्जा स्थान आहे .. ह्या स्तोत्र शी माझी नाळ माझ्या आजोबां मुळे बांधली गेली . ते रोज संध्याकाळी दिवेलगणीच्या वेळी घरातल्या घरात एरझारे घालत हे स्तोत्र म्हणायचे .. त्यामुळे असेल कदाचित माझेही तोंडपाठ झाले आणि आता मी ही रोज संध्याकाळी घरात एरझारे घालत त्याचे पठन करते .. दिवसाचा शिणवटा क्षणात नाहीस होतो.

    Liked by 1 person

    उत्तर द्या

  5. निखिलेश गोडबोले's avatar

    Posted by निखिलेश गोडबोले on सप्टेंबर 21, 2020 at 3:00 सकाळी

    खूपच छान लेख, पण फार थोड्या जणांना असे अनुभव आले असावेत कारण प्रत्येक ठिकाणी आपण(मी सुद्धा ) फक्त चमत्काराची फुटपट्टी लावत असतो. मुळात साधक व्हयला सुद्धा एक किमान पातळी पार करावी लागते हे आपण सोयीस्कर विसरतो, आपण रामाकडे काय मागतो तर संकटांना माझ्यापासून दूर ठेव किंवा मला संकटातून सोडव, तर खरे साधक म्हणतात देवा संकटांशी लढायची वृत्ती मला दे, म्हणजे मला त्याच निवारण करून तुझं अधिक अधिक नाम घेता येईल. माझ्यात जे वाईट आहे ते माझं आणि जे चांगलं आहे ते सगळं तुझं. *(हे जे इथे लिहिलं आहे त्यात माझं काही नाही, गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनातलं काही विचार इथे मांडले आहेत )*
    || श्रीराम जय राम जय जय राम ||

    Liked by 1 person

    उत्तर द्या

यावर आपले मत नोंदवा