Archive for ऑगस्ट, 2020

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा ।
त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा ॥
नेती नेती शब्दे नये अनुमाना ।
सुरवर मुनिजन योगी समाधि न ये ध्याना ॥ १ ॥

जय देव जय देव जय श्रीगुरुदत्ता ।
आरति ओवाळीता हरली भवचिंता ॥ ध्रु० ॥

सबाह्य-अभ्यंतरी तूम एक दत्त ।
अभाग्यासी कैची कळेल ही मात ॥
पराहि परतली तेथे कैचा हा हेत ।
जन्मरणाचा पुरलासे अंत ॥ जय० ॥ २ ॥

दत्त येऊनिया उभा ठाकला ।
सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला ॥
प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला ।
जन्मरमरणाचा फेरा चुकवीला ॥ जय० ॥ ३ ॥

दत्त दत्त ऐसे लागले ध्यान ।
हारपले मन झाले उन्मन ॥
मीतूपणाची झाली बोळवण ।
एकाजनार्दनी श्रीदतध्यान ॥ जय देव० ॥ ४ ॥

आरती शब्द मराठी माती येथून घेतले आहेत

युगे अठ्ठावीस

युगे अठ्ठावीस विटेवरी उभा ।
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ॥
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा ।
चरणीं वाहे भीमा उद्धरी जगा ॥ १ ॥

जय देव जय देव जय पांडुरंगा ।
रखुमाईवल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा ॥ ध्रु० ॥

तुळसीमाळा गळा कर ठेवुनि कटी ।
कासे पीतांबर कस्तुरी लल्लाटी ॥
देव सुरवर नित्य येती भेटी ।
गरुड हनुमंत पुढे उभे रहाती ॥ जय० ॥ २ ॥

धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा ।
सुवर्णाची कमळे वनमाळा गळा ॥
राई-रखुमाबाई राणीया सकळा ।
ओवाळीती राजा विठोबा सावळा ॥ जय० ॥ ३ ॥

ओवाळू आरत्या कुरवंड्या येती ।
चंद्रभागेमाजी सोडुनिया देती ॥
दिंड्या पताका वैष्णव नाचती ।
पंढरीचा महिमा वर्णाचा किती ॥ जय० ॥ ४ ॥

आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।
चंद्रभागेमध्ये स्नाने जे करिती ॥
दर्शनहेळामात्रे तया होय मुक्ती ।
केशवासी नामदेव भावे ओवाळीती ॥ जय० ॥ ५ ॥

आरती शब्द मराठी माती येथून घेतले आहेत

दुर्गे दुर्घट भारी

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।
अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी ॥
वारी वारी जन्ममरणाते वारी ।
हारी पडलो आता संकट नीवारी ॥ १ ॥

जय देवी जय देवी महिषासुरमथिनी ।
सुरवरईश्वरवरदे तारक संजिवनी ॥ ध्रु० ॥

त्रिभुवनी भुवनी पाहता तुज ऐसी नाही ।
चारी श्रमले परंतु न बोलवे काही ॥
साही विवाद करिता पडिले प्रवाही ।
ते तूम भक्तांलागी पावसि लवलाही ॥ जय० ॥ २ ॥

प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासा ।
क्लेशापासुनि सोडी तोडी भवपाशा ॥
अंबे तुजवाचून कोण पुरविल आशा ।
नरहरि तल्लीन झाला पदपंकजलेशा ॥ जय० ॥ ३ ॥

आरती शब्द मराठी माती येथून घेतले आहेत

लवथवती विक्राळा

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।
वीषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा ॥
लावण्यसुंदर मस्तकी बाळा ।
तेथुनिया जल निर्मळ वाहे झुळझूळा ॥ १ ॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा ॥ ध्रु० ॥

कर्पूरगौरा भोळा नयनी विशाळा ।
अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा ॥
विभुतीचे उधळण शितिकंठ नीळा ।
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ जय देव० ॥ २ ॥

देवी दैत्यी सागरमंथन पै केले ।
त्यामाजी जे अवचित हळाहळ उठिले ॥
ते त्वा असुरपणे प्राशन केले ।
नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले ॥ जय देव० ॥ ३ ॥

व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥
शतकोटीचे बीज वाचे उच्चारी ।
रघुकुलतिलक रामदासा अंतरी ॥ जय देव जय देव० ॥ ४ ॥

आरती शब्द मराठी माती येथून घेतले आहेत

नाना परिमळ दूर्वा

नानापरिमळ दूर्वा शमिपत्रे ।
लाडू मोदक अन्ने परिपूरित पाते ॥
ऐसे पूजन केल्या बीजाक्षरमंत्रे ।
अष्टहि सिद्धी नवनिधि देसी क्षणमात्रे ॥१॥

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
तुझे गुण वर्णाया मज कैची स्फूर्ती ॥ ध्रु० ॥

तुझे ध्यान निरंतर जे कोणी करिती ।
त्यांची सकलहि पापे विघ्नेही हरती ॥
वाजी वारण शिबिका सेवक सुत युवती ।
सर्वहि पावुनि अंती भवसागर तरती ॥ जय देव० ॥ २ ॥

शरणागत सर्वस्वे भजती तव चरणी ।
कीर्ति तयांची राहे जोवर शाशितरणी ॥
त्रैयोक्यो ते विजयी अद्भुत हे करणी ।
गोसावीनंदन रत नामस्मरणीम ॥ जय देव जय देव० ॥३॥

आरती शब्द मराठी माती येथून घेतले आहेत

शेंदुर लाल चढायो

शेंदुर लाल चढायो अच्छा गजमुखको ।
दोंदिल लाल बिराजे सुत गौरीहरको ॥
हाथ लिये गुडलड्डू साई सुरवरको ।
महिमा कहे न जाय लागत हूँ पदको ॥१॥

जय जयजी गणराज विद्या सुखदाता ।
धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता ॥ ध्रु० ॥

अष्टी सिद्धी दासी संकटको बैरी ।
विघ्नविनाशन मंगलमूरत अधिकाई ॥
कोटीसुरजप्रकाश ऐसी छबि तेरी ।
गंडस्थलमदमस्तक झुले शशिबहारी ॥जय० ॥२॥

भावभगतिसे कोई शारणागत आवे ।
संतति संपति सबही भरपूर पावे ॥
ऐसे तुम महाराज मोको अति भवे ।
गोसावीनंदन निशिदिन गुण गावे ॥ जय० ॥३॥

आरती शब्द मराठी माती येथून घेतले आहेत

सुखकर्ता दु:खहर्ता

सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ॥
सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची ।
कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥१॥

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ध्रु॥

रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ॥
हिरेजडीत मुगुट शोभतो बरा ।
रुणझुणती नूपरें चरणीं घागरिया॥२॥

लंबोदर पीतांबर फणिवरबंधना ।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ॥
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटीं पावावें निर्वाणीं रक्षावें सुरवर वंदना ॥ ७॥

आरती शब्द मराठी माती येथून घेतले आहेत.


माझ्या लेखिका मैत्रिणी सोनालीहीने तिला सापडलेली या आरतीची बाकीची कडवी तिच्या ब्लॉग वर ठेवली आहेत. ती येथे खाली देतो आहे.

माथा मुकुट मणी कानी कुंडले ।
सोंड दोंदावरी शेंदुर चर्चिले ।।
नागबंद सोंड-दोंद मिराविले ।
विश्वरूप तया मोरयाचे देखिले ॥ जय० ॥३॥

चतुर्भुज गणराज बाही बाहुटे ।
खाजयाचे लाडू करुनी गोमटे ।।
सुवर्णाचे ताटी शर्करा घृत ।
अर्पी तो गणराज विघ्ने वारीतो ॥ जय० ॥४॥

छत्रे चामरे तुजला मिरविती ।
उंदीराचे वाहन तुजला गणपती ।।
ऐसा तु कलीयुगी सकळीक पाहसी ।
आनंदे भक्तासी प्रसन्न होसी ॥ जय० ॥५॥

ता ता धि मि किट धि मि किट नाचे गणपती ।
ईश्वर पार्वती कौतुक पाहती ।।
ताल मृदंग वीणा घोर उमटती ।
त्यांचे छंदे करुनी नाचे गणपती ॥ जय० ॥६॥

mating कॉल

अनिश

अनिश सरळ नाक, उंच सडपातळ आणि काटक शरीर, गोरा रंग, काळे डोळे, तल्लख बुद्धी वर्गात नेहमी पहिला, ९ वीत शाळेत जाणारा हुशार विद्यार्थी. अनिशाचे बाबा यांत्रिकी अभियंता. विमानाची इंजिन बनवणाऱ्या कंपनीत कामाला. रात्री उशिरा बसून flight simulation गेम खेळणे हा त्यांचा आवडता छंद.   

प्रसंग १

अनिश शाळेत हुशार व खेळात पुढे आहे, जोरात धावणे यामुळे सर्वांना चांगला माहिती आहे. २५ जणांच्या वर्गातील १५ मुलींमधे अनिश वर्गात शिरला की एक प्रकारचे प्रफुल्लित वातावरण तयार होई. सगळ्याच जणी तो आपल्याकडे बघतोय का हे नजरेच्या कोपऱ्यातून चोरटा द्रुष्टीक्षेप टाकून पाहत. पण जेव्हा अनिशला वर्गात चौफेर नजर टाकून आपल्या जागेवर बसे तेव्हा त्यांच्या नजरेला नजर देण्याचे धाडस एकीलाही जमत नसे, त्यामुळे अनिश नेहमीप्रमाणे सायकल वरून शाळेत आल्यावर सरळ येऊन आपल्या जागेवर बस असे. काही दिवसानी, त्याला जाणवू लागले की दुसर्‍या बाकावर बसणाऱ्या कोमलची त्याच्यावर रेंगाळणारी व त्याने पहिले की हळूच दूर जाणारी नजर. ही गोष्ट  त्याला विचारात पाडत असे.

प्रसंग २

नेहमी प्रमाणे अनिश बाबासोबत रात्री उशिरा flight simulation खेळत होता. विमानात landing gear चे काम कसे चालते ही तंत्र बाबा दाखवत होते.

“अरे, हे बघ, एक नजर टाकून विमानाचा वेग बघायचा, आणि पटकन त्याच वेळी दुसर्‍या कोपऱ्यातून उंची पाहायची, आणि हा असा gear टाकायचा, एकदम भारी वाटते ना!” बाबा अनिशला सांगत होते.

अनिशला क्षणार्धात कोमलची डोळ्यांच्या कोपऱ्यातून त्याला पहाणारी नजर आठवली आणि त्याला “भारी वाटले” ही भावना अचानकपणे कोमलच्या त्या नेत्र कटाक्षाला फिट्ट बसली.

प्रसंग ३ 

दुसर्‍या दिवशी अनिश शाळेत आला. वर्गात त्याच्या जागेवर नेहमी सारखा बसायला तो उभा असताना त्याची नजर चौफेर गेली आणि अपेक्षेप्रमाणे कोमलची नजर त्याला न्याहाळत होती. रात्रीचा “भारी वाटते” हे वाक्य कानात गुंजले.   आज तिने नजर फिरवायच्या आत अनिशने कोमलच्या नजरेला आपल्या नजरेत कैद केले. नंतरचा दोन अडीच सेकंदाचा काळ अनिश व कोमल युगापेक्षा मोठा वाटला.

प्रसंग ४

आज रात्री नेहमी प्रमाणे flight simulation करायला अनिश बाबाची आतुरतेने वाट बघत होता. बाबाला कामावर उशीर झाला. अनिशला काही landing gear चे तंत्र नीट माहिती नव्हते. त्याने बाबाना येई पर्यंत flight simulation मध्ये विमान उडवत चालवले. 

“बाबा अजून मला landing नीट करता येत नाही काय करू” बाबा घरी आल्यावर त्यांना विचारले.

“अरे त्यात काय आहे, हे बघ, हा वेग कमी करत उंची हळूहळू कमी केली आणि एक नजर इकडे एक नजर तिकडे  पटकन landing gear टाकायचा” बाबानी सफाईने अनिशचे विमान उतरवले.

“जो पर्यंत जमात नाही तो पर्यंत कर, नजर इकडे आणि तिकडे, मग तुला ही भारी वाटेल” बाबा उठून जेवायला गेले. 

प्रसंग ५

आज अनिश शाळेत नेहमी पेक्षा लवकर पोहोचला होता. आपल्या जागेवर बसून काहीतरी वाचल्याचे करत होता. शाळेची बस आली आणि मुले मुली वर्गात येऊ लागले. दारातून आत येताना अनिश त्याच्या जागेवर बसलेला पाहून कोमल चमकली. त्याच क्षणी अनिशने तिला आपल्या नजरेच्या बंधात खिळवले आणि हळूच वर्गाच्या दुसर्‍या दाराकडे नजर टाकली. वर्ग संपल्यावर अनिश मागच्या दारातून बाहेर पडला व उभा राहिला. त्याला उठताना पाहून कोमल ही जागेवरून उठली आणि मागच्या दाराकडून बाहेर गेली.

“तू मला असे का बघतेस?” अनिश

“काही नाही, तुला बघितले की माझा दिवस चांगला जातो.” कोमल

“ते तर तू मला केव्हा ही बघू शकतेस” अनिश

“पण तेव्हा तू बघत नसतोस ना. सगळ्या वर्गा समोर तू मा‍झ्या नजरेला नजर दिलीस ना, की फार भारी वाटते”  कोमल

“अजून केव्हा भारी वाटते?” अनिश तिला ही भारी वाटते या भावनेने उत्साही झाला

“चल आता मला भूक लागली आहे, नंतर भेटू तेव्हा सांगते” कोमल तिच्या बाकापाशी जाऊन डबा खाऊ लागली.  

प्रसंग ६

बस नेहमीच्या वेळी सुटली, कोमल बसने न जाता, शाळेत थांबली होती. अनिश शोधत वर्ग मागे आला. कोमलला तिथे पाहून त्याला काही वेगळे वाटू लागले. कोमल आता त्याच्या नजरेला नजर द्यायला काहीशी कचरत होती. अनिश तिच्या जवळ येऊन उभा राहिला.

“आज बस का सोडलीस”

“असेच”

“तू का मागे राहिलास?”

“आज सायकल नाही आणली, चालत जाईन, म्हणून उभा होतो. पण तू बस मध्ये चढताना दिसली नाहीस.”

“तुला काय ठाऊक मी इकडे आहे?” कोमलच्या ह्रदयाचे ठोके वाढले होते. तिने एक पाऊल अनिशकडे टाकले.  

“मग तू कोठे जाणार होतीस?” अनिशला आपली कानशील गरम झाल्याचा भास झाला. 

कोमल काही न बोलता अनिशच्या जवळ येऊन उभी राहिली. तिच्यात व अनिश मध्ये काही इंच अंतर उरले होते. 

दोघांच्या ही शरीराला थोडा कंप सुटला, कोमलने  नजर उचलून अनिशकडे पहिले. अनिशचा श्वास तिला चेहर्‍यावर जाणवला.

अनिशला काय होते आहे नक्की कळत नव्हते, भारी वाटतंय की भीती वाटते. एकच क्षण गेला असेल. “जो पर्यंत जमत नाही तो पर्यंत प्रयत्न कर, जमले की तुला भारी वाटेल” हे वाक्य कानी पडले. अनिशने कोमलला हळूच स्पर्श केला.

“कोण आहे तिकडे” मागून आवाज आला, कोणी तरी शाळेचे वर्ग बंद करायला आले होते.

दोघंही आवाजाने दचकले, कोमलला समोरून शाळेची रखवाली करणारे मामा येताना दिसले. आता दोघांची भीतीने गाळण उडली होती. रखवाली करणारे मामा तिथे आले अनिशला त्यांनी सहज ओळखले

“काय अनिश घरी जायला उशीर का करतोय?”

“अं , काही नाही मामा, कोमलची अभ्यासाची वही सापडत नाही म्हणून ती बघतो आहोत, हो ना कोमल?”

“हो ना, मामा, तुम्हाला दिसली वर्ग बंद करताना तर पहा बरं”

कशी  तरी वेळ टाळून गेली

प्रसंग ७

कोमल घरी बसने आली नाही म्हणून तिच्या वडीलांनी कोमलला धारेवर धरले. कोमल ओक्साबोक्शी रडून अनिश सोबत असल्याचे  बोलून गेली. दुसर्‍या दिवशी कोमलचे बाबा पोलीस घेऊन शाळेत आले. अनिश पुरता घाबरून गेला. पोलीसानी रखवालदार मामा व शाळेतील वर्ग शिक्षक यांना थोडी विचारपूस केली. कोमलच्या वडीलांच्या आग्रहामुळे जबानी सूचना देऊन घटना रद्द केली.

प्रसंग ८

शाळेत जाणे अनिशला अवघड वाटू लागले, अनिशचे वर्गात अभ्यासात लक्ष लागे ना. पहिला येणार मुलगा या छोट्या घटने मुळे मोडतो की काय यामुळे अनिशचे आई-बाबा काळजीत पडले. बाबानी अनिशला विचारले. अनिश भरल्या आवाजात म्हणाला “बाबा काय भारी आहे आणि काय नाही  यातील फरक नाही रे कळला मला. मग आणि ते समोर आल्यावर कसे वागावे ह्यात मी गडबडलो” आता ९ वीत  शाळा बदल करून आता दुसरी शाळा घेणे त्यांना क्रम प्राप्त झाले.

प्रतिक

प्रतिक कुरळे केस, बोलक चेहरा, वर्ण गव्हाळ, पिंगट डोळे, स्वभाव शांत, थोडासा अबोल पण विषय मिळला तर गप्पा खूप मारेल कारण माहिती खूप. ९ वीत शिकणारा मुलगा, वर्गात पहिल्या पाचात नंबर असे. प्रतिकचे बाबा बँकेत कामाला. रात्री झोपायच्या आधी चालायला जाणे व दोघांना गप्पा मारायला आवडे. 

प्रसंग १

वर्गात शिक्षकानी प्रश्न विचारला की सर्वात आधी उत्तर द्यायला तयार आणि कोणालाही प्रश्न पडला तर शिक्षक सांगण्या आधी त्या प्रश्नावर मुद्दे मांडणार मुलगा म्हणून प्रतिक सर्वांना माहिती आहे. कोणताही विषय असो त्यावर विचार मांडणे व चर्चा करणे ही प्रतिकची सहज प्रवृत्ती होती. प्रतिक वर्गात आला की सर्व मूला-मुलीना एक प्रकारचा आनंद होई. शिक्षकांना कदाचित काही वेळ अति बोलतो असेही वाटे. वर्गात सर्वांशी मिळून वागणे, काम असेल तर मोचके बोलणे आणि कोणाला प्रश्न असेल तर खूप चर्चा करणे हा प्रतिकच नैमित्तिक दिनक्रम असे.

प्रसंग २

नेहमी प्रमाणे प्रतिक जेवून रात्री बाबासोबत चालायला उतरला होता. प्रतिकचा आवडता विषय बायोलॉजी व त्यावरून रात्री आजूबाजूला येणारे रातकिडयाचे आवाज, कधी पाऊस पडला असेल तर  बेडूक ओरडतानाचे आवाज यावर प्रतिक व बाबाच्या गप्पा रंगत.

“तो ऐक आवाज आला का” प्रतिक

“नाही” बाबा

“नीट ऐक, मध्ये थांबून परत आवाज करतोय” प्रतिक

“ह आता आला” बाबा

“हा आवाज male frog चा आहे, ते त्याच्या female ला आकर्षित करायला असा आवाज करतात” प्रतिक

“तुला रे काय ठाऊक” बाबा

“अरे बाबा, ही खूप साधी गोष्ट आहे पाऊस पडून पाणी जमले की बेडूकांचा mating season येतो. काही काही बेडकांच्या जमातीत बेडूक मादी meting झाल्यावर नर बेडकाला खाऊन टाकते. कारण तिला अंडी देऊन तिथे बसून राहावे लागते मग तिला खायला दुसरे काही नाही मिळत” प्रतिक

“अरे हे तर भयंकर आहे” बाबा

“तीच तर गंमत आहे, तरी पण तो बेडूक mating call देतो.” प्रतिक

प्रसंग ३

वर्गात विषय कोणता ही असो त्यावर गप्पा मारणे व वेगवेगळे अर्थ काढणे ही नेहमीची चर्चा प्रतिक व चित्रा करीत. आजचा विषय होता city planning in Asia. या दोघांनी कंबोडियाची राजधानी फ़्नोम पेन्ह येथे सार्वजनिक सोई कशा आहेत यावर चर्चा केली. शाळे तर्फे गट बनवून नव्या युगातील शहर विकास उपक्रम यावर वाद विवाद आणि चर्चा करण्याची नाव नोंदणी केली. यात वेळ कसं गेला हे कळले नाही. तयारी करायला वेळ मिळावा म्हणून प्रतिक शाळेची बस सोडून चित्रा सोबत मागे थांबला. विषय दोघांच्या आवडीचा होता. पाण्याचे प्रश्न, पाऊस पडून येणारा पूर,या पासून वाचण्यासाठी जमिनी खाली जलन्निस्सारण रचना कशी बनवावी यावर विचार करून दोघ उशिरा घरी गेले.

प्रसंग ४

प्रतिक उशिरा घरी आल्यामुळे जेवायला उशीर झाला होता. त्यामुळे प्रतिक व बाबाना  रात्री चालायला उतरायला नेहमी पेक्षा उशीर झाला होता.

आज काही पाऊस पडला नव्हता. त्यामुळे बेडकांचे आवाज सोबतीला नव्हते. व रात्रीचे दिवे वाटेवर जागोजागी लागले होते. जिथे दिवे नाहीत तिथे वाटेवर अंधार होता. प्रतिक अजून ही जलन्निसारण उपक्रम वर विचार करत होता. त्यामुळे अजून गप्पा सुरू झाल्या नव्हत्या.  

चलता चलता वाटेच्या बाजूला असलेल्या बाकावर दोन व्यक्ति बसलेल्या दिसल्या. प्रतिक व बाबा त्यांच्या बाजूने गेले. तरी त्या दोघांना काही जाणवले नाही.

“तू बघितलेस?”

“काय?”

“ते काय करत होते?”

“नाही, कोण?”

“अरे कोण काय? त्या बाकावर बसलेले ते दोघे?”

प्रतिकने मागे  वळून पहिले, त्याला अंधारात नीट दिसले नाही. एक मुलगा व बाजूला एक मुलगी बसलेले दिसले

“नाही, नीट दिसत नाही ते, काय करतायत?”

“अरे बघ आपण परत जाऊ तेव्हा”

“बरं, तू काय विचार करतोयस?”

गप्पा सुरू झाल्या प्रतिक पाण्याचे प्रश्न कसे असतात यावर बोलू लागला. परतीच्या मार्गावर बाबानी त्याला हळूच जाणीव करून दिली की ते दोघे अजून आहेत.

“अरे ही नक्की काय करतायत?” प्रतिकने  आश्चर्य व्यक्त करीत विचारले. कारण त्याला दिसले की ती मुलगी, मुलांचा हात हातात घेऊन चक्क nail cutter घेऊन नख कापत होती. ते ही या अंधारात.

“हे बघ परवा तू मला नर बेडकाला खाणाऱ्या मादी बेडकीबद्दल सांगितले ना. माणसाचे ही बरेचसे तसेच आहे. या दोन व्यक्ती बद्दल आता तेच होत आहे, फक्त हे थोडे मानवी प्रकाराने आहे. पण mating call हा योग्य वेळी द्यावा ही गोष्ट नीट समजून घेतली तर काही चूक होणार नाही.”

प्रतिक क्षणभर या विचारात मग्न झाला व हसला काहीसा आणि परत गप्पा मारू लागला

प्रसंग ५

इकडे city planning ची स्पर्धा जवळ आली होती. प्रतिक व चित्रा रोज उशिरा थांबून तयारी करत होते. करताना नवीन जमिनी खालच्या नालीचा नकाशा तयार झाल्याच्या उत्साहात प्रतिकने चित्राला एकदम आनंदाने मिठी मारली, चित्राला तेवढाच आनंद झाला होता की हा नकाशा आपल्याला स्पर्धेत नाव मिळवून देईल. तिने ही मिठी स्वीकारली. त्या अवस्थेत प्रतिक चित्राच्या कानात कुजबुजला

“हा काही mating call नाही … चल सोड आता”

दोघांनी हसून आपापले हात मागे घेतले व नकाशा गुंडाळून इतर तयारीला लागले

प्रसंग ६

स्पर्धा चांगली झाली प्रतिक व चित्राच्या नकाशाला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. या प्रकारच्या स्पर्धेत त्यांच्या शाळेला मिळालेले ही पहिले पारितोषिक होते त्यामुळे शाळेने खूप कौतुक केले.

प्रसंग ७

आज रात्री गप्पा सुरू करायच्या आधी प्रतिक बाबाना म्हणाला तुम्ही त्या मानवी mating call ची उपमा  दिल्या मुळे  मला काय कुठे योग्य ही जाणीव किती सहज उमगली. आता mating call वर शंका नाहीच, तर यावर विचार आणि चर्चा करायला मी आणि माझे मित्र-मैत्रिणी सज्ज आहोत

all copy rights are with author @viveksathe21

माखन चोर

शर्विल सजला आहे जन्माष्टमीच्या दिवशी

माखन चोर माखन चोर
नाही बरे हा मिश्किल ।
स्वारी आहे आनंदात
नाव तयाचे शर्विल ॥ १ ॥

आईने अंथरले मऊ मऊ दुपटे
बाबानी दिली लाल टोपी खास ।
आजोबानी आणली गोड बासरी
आजीने खोचले हळुच मोराचे पिस ॥ २ ॥

दिसतो निरागस डोळा
मोठा लोण्याचा गोळा ।
उमटती बाल मनात भाव
घेतील उज्ज्वल भविष्याचा ठाव ॥ ३ ॥

@विभासा