माझ्या बाल सवंगड्यांनो, … (ओ!) घरी बसुन TV / Video Games बघुन जेव्हा फार Bore होते, पण खेळायला खुप लांब जायला वेळ नसतो आणि काहीतरी कंटाळा घालवणारा Game खेळावासा वाटतो अशावेळी मला एक खेळ खेळावासा वाटतो. तो मी आज तुम्हाला सांगणार आहे. या खेळाचे नाव आहे – लंगडी! … हो जेव्हा एखाद्याचा पाय दुखावला तर तो/ती जरा लंगडत चालतो/ते तसेच लंगडत पकडणे. पण खरे पायाला लागले असताना नाही बर! तर लंगडी हा खेळ खुप सोपा आणि रंगतदार आहे. हा खेळ खेळण्यासाठी फार तयारी लागत नाही. एक सपाट, मोकळी जागा – जसे HDB चे stilt किंवा Rubber mat चा Play area, Open grass area अशी कोणती ही मोकळी जागा चालते. पण Swimming pool च्या जवळ, Parking lot च्या जवळ नको. एकदा तुमची जागा नक्की झाली की मग सुटायचे. दोन Captain आपापला गट मागुन घेतो. प्रत्येक गटात साधारणपणे ६-७ खेळाडु-गडी असावे, म्हणजे मज्जा येते.
जागा ठरली, गडी जमले की मैदान आखायचे. खालील दिलेल्या चित्राप्रमाणे अ” आणि “ब” हे विरुद्ध बाजुला आखुन घ्यावे. आखण्यासाठी काही मिळाले नाही तर, चक्क चपला / बुट ठेउन “अ” आणि “ब’ जागा ठरवुन घ्यावी.
एखादा गडी जो पंचाचे काम करु शकतो, म्हणजे कोण Out – बाद झाला, कोणी पाय टेकला, वेळ संपला का, इत्यादी काम करणे याची जबाबदारी आणि सोबत एक शिट्टी त्याला द्यावी.
लंगडी घालत पकडणे:-
- डाव सुरु झाल्यावर पकडणारा गडी एका पायावर तोल सांभाळत दुसरा पाय गुढग्यात दुमडुन अर्थात वर उचलुन, पुन्हा जमिनीला न टेकता दुस~या पायावर उडी मारत मारत पळणा~या खेळाडुंना शिवण्याचा प्रयत्न करतो.
- लंगडी घालत पळणा~या गड्याला शिवल्यास पळणारा गडी बाद होतो. हे दर्शवण्यासाठी पंच एक अखुड-शिट्टी वाजवतो. बाद झालेला खेळाडु लगेच मैदानाबाहेर जातो.
- पळणारा गडी पळता पळता मैदानाबाहेर गेल्यास बाद घोषित केला जातो. हे दर्शवण्यासाठी पंच एक अखुड-शिट्टी वाजवतो. बाद झालेला खेळाडु लगेच मैदानाबाहेर जातो.
- पळणारा प्रत्येक एक गडी बाद झाल्यावर पकडणा~या गटास एक गुण मिळतो.
- पहिल्या ततीत पळण्यास आलेले ३ गडी बाद झाल्यावर पुढील ३ गडी एकत्रपणे पळण्यास मैदानात उतरतात.
- लंगडी घालणा~या खेळाडुने सुरुवातीला जो पाय गढग्यात दुमडुन अर्थात वर उचलुन लंगडी घालायला सुरुवात केली तो पाय किंवा एक अथवा दोन्ही हात जमिनीवर टेकवले किंवा स्वत: जमिनीवर पडला तर लंगडी घालणारा खेळाडु बाद घोषित केला जातो. हे दर्शवण्यासाठी पंच एक अखुड-शिट्टी वाजवतो.
- लंगडी घालणारा खेळाडु बाद झाल्यास लगेच मैदानाबाहेर जातो. तो बाहेर गेल्यानंतर पुढील खेळाडु “अ” या ठिकाणाहुन पकडण्यासाठी लंगडी घालत मैदानात येतो.
- अशाप्रकारे १० मिनिटे पकडणारा गट लंगडी घालत पळणा~या गटाचे खेळाडु बाद करुन गुण मिळवतो. १० मिनिटे संपल्यावर पंच लांब-शिट्टी वाजवुन वेळ संपल्याची घोषणा करतो.
मध्यंतर आणि पुढे:-
- पळणारा गट पकडण्याच्या जागी (“अ”) जाउन विश्रांती घेतो.
- पकडणारा गट पळण्याच्या जागी (“ब”) जाउन विश्रांती घेतो.
- पंच मध्यंतर संपल्याची आणि डाव बदलल्याची शिट्टी वाजवुन घोषणा करतो.
- वर “डाव सुरु करण्यासाठी” आणि “लंगडी घालत पकडणे” मध्ये लिहिल्याप्रमाणे खेळ सुरु होतो.
निर्णय:-
- दोन्ही गटांचे लंगडी घालुन झाल्यावर पंच आणि गुण नोंदणी करणारे पंच मिळुन निर्णय देतात.
- जो गट अधिक गुण मिळावतो तो गट विजयी घोषित केला जातो.
- दोन्ही गटांचे गुण समान असल्यास, ज्या गटाने कमी पकडणारे खेळाडु वापरले तो गट विजयी घोषित केला जातो.
खेळ खेळतानाचे छायाचित्र:-

