चंद्राची कोर

चंद्राची कोर

हलक्या पावलांनी येते संध्याकाळ
मग ती ही येते

शंकराच्या जटांवर
शामल ललाटावर
लालिमा आकर्षक करायला क्षितिजावर
येते ही नाजुक चंद्राची कोर

दिनकराच्या अस्तानंतर
रात्रीच्या कालपटलावर
सौंदर्य खुलवण्यासाठी येते
प्रतिपदेची ही रेखीव चंद्रकोर

@विभासा

10 responses to this post.

  1. manasi godbole's avatar

    वा क्या बात है

    Liked by 1 person

    उत्तर द्या

  2. Varad Pradhan's avatar

    मस्त…

    पुढे वाढव अजून

    येते घेऊन सगे सोबती..
    तारे अन् नक्षत्र संगती

    त्या सूर्याला करून वंदन..
    फुलविते शितलतेचे बंधन..

    Liked by 1 person

    उत्तर द्या

  3. ANITA PHADKE's avatar
  4. मंगेश's avatar

    मस्त जमली आहे, विवेक 👌🏽

    Liked by 1 person

    उत्तर द्या

  5. amit951's avatar

    अलंकारिक आणि मोघम शब्दरचना
    तसेच सुंदर चित्रफीत विवेक

    Liked by 1 person

    उत्तर द्या

यावर आपले मत नोंदवा