mating कॉल

अनिश

अनिश सरळ नाक, उंच सडपातळ आणि काटक शरीर, गोरा रंग, काळे डोळे, तल्लख बुद्धी वर्गात नेहमी पहिला, ९ वीत शाळेत जाणारा हुशार विद्यार्थी. अनिशाचे बाबा यांत्रिकी अभियंता. विमानाची इंजिन बनवणाऱ्या कंपनीत कामाला. रात्री उशिरा बसून flight simulation गेम खेळणे हा त्यांचा आवडता छंद.   

प्रसंग १

अनिश शाळेत हुशार व खेळात पुढे आहे, जोरात धावणे यामुळे सर्वांना चांगला माहिती आहे. २५ जणांच्या वर्गातील १५ मुलींमधे अनिश वर्गात शिरला की एक प्रकारचे प्रफुल्लित वातावरण तयार होई. सगळ्याच जणी तो आपल्याकडे बघतोय का हे नजरेच्या कोपऱ्यातून चोरटा द्रुष्टीक्षेप टाकून पाहत. पण जेव्हा अनिशला वर्गात चौफेर नजर टाकून आपल्या जागेवर बसे तेव्हा त्यांच्या नजरेला नजर देण्याचे धाडस एकीलाही जमत नसे, त्यामुळे अनिश नेहमीप्रमाणे सायकल वरून शाळेत आल्यावर सरळ येऊन आपल्या जागेवर बस असे. काही दिवसानी, त्याला जाणवू लागले की दुसर्‍या बाकावर बसणाऱ्या कोमलची त्याच्यावर रेंगाळणारी व त्याने पहिले की हळूच दूर जाणारी नजर. ही गोष्ट  त्याला विचारात पाडत असे.

प्रसंग २

नेहमी प्रमाणे अनिश बाबासोबत रात्री उशिरा flight simulation खेळत होता. विमानात landing gear चे काम कसे चालते ही तंत्र बाबा दाखवत होते.

“अरे, हे बघ, एक नजर टाकून विमानाचा वेग बघायचा, आणि पटकन त्याच वेळी दुसर्‍या कोपऱ्यातून उंची पाहायची, आणि हा असा gear टाकायचा, एकदम भारी वाटते ना!” बाबा अनिशला सांगत होते.

अनिशला क्षणार्धात कोमलची डोळ्यांच्या कोपऱ्यातून त्याला पहाणारी नजर आठवली आणि त्याला “भारी वाटले” ही भावना अचानकपणे कोमलच्या त्या नेत्र कटाक्षाला फिट्ट बसली.

प्रसंग ३ 

दुसर्‍या दिवशी अनिश शाळेत आला. वर्गात त्याच्या जागेवर नेहमी सारखा बसायला तो उभा असताना त्याची नजर चौफेर गेली आणि अपेक्षेप्रमाणे कोमलची नजर त्याला न्याहाळत होती. रात्रीचा “भारी वाटते” हे वाक्य कानात गुंजले.   आज तिने नजर फिरवायच्या आत अनिशने कोमलच्या नजरेला आपल्या नजरेत कैद केले. नंतरचा दोन अडीच सेकंदाचा काळ अनिश व कोमल युगापेक्षा मोठा वाटला.

प्रसंग ४

आज रात्री नेहमी प्रमाणे flight simulation करायला अनिश बाबाची आतुरतेने वाट बघत होता. बाबाला कामावर उशीर झाला. अनिशला काही landing gear चे तंत्र नीट माहिती नव्हते. त्याने बाबाना येई पर्यंत flight simulation मध्ये विमान उडवत चालवले. 

“बाबा अजून मला landing नीट करता येत नाही काय करू” बाबा घरी आल्यावर त्यांना विचारले.

“अरे त्यात काय आहे, हे बघ, हा वेग कमी करत उंची हळूहळू कमी केली आणि एक नजर इकडे एक नजर तिकडे  पटकन landing gear टाकायचा” बाबानी सफाईने अनिशचे विमान उतरवले.

“जो पर्यंत जमात नाही तो पर्यंत कर, नजर इकडे आणि तिकडे, मग तुला ही भारी वाटेल” बाबा उठून जेवायला गेले. 

प्रसंग ५

आज अनिश शाळेत नेहमी पेक्षा लवकर पोहोचला होता. आपल्या जागेवर बसून काहीतरी वाचल्याचे करत होता. शाळेची बस आली आणि मुले मुली वर्गात येऊ लागले. दारातून आत येताना अनिश त्याच्या जागेवर बसलेला पाहून कोमल चमकली. त्याच क्षणी अनिशने तिला आपल्या नजरेच्या बंधात खिळवले आणि हळूच वर्गाच्या दुसर्‍या दाराकडे नजर टाकली. वर्ग संपल्यावर अनिश मागच्या दारातून बाहेर पडला व उभा राहिला. त्याला उठताना पाहून कोमल ही जागेवरून उठली आणि मागच्या दाराकडून बाहेर गेली.

“तू मला असे का बघतेस?” अनिश

“काही नाही, तुला बघितले की माझा दिवस चांगला जातो.” कोमल

“ते तर तू मला केव्हा ही बघू शकतेस” अनिश

“पण तेव्हा तू बघत नसतोस ना. सगळ्या वर्गा समोर तू मा‍झ्या नजरेला नजर दिलीस ना, की फार भारी वाटते”  कोमल

“अजून केव्हा भारी वाटते?” अनिश तिला ही भारी वाटते या भावनेने उत्साही झाला

“चल आता मला भूक लागली आहे, नंतर भेटू तेव्हा सांगते” कोमल तिच्या बाकापाशी जाऊन डबा खाऊ लागली.  

प्रसंग ६

बस नेहमीच्या वेळी सुटली, कोमल बसने न जाता, शाळेत थांबली होती. अनिश शोधत वर्ग मागे आला. कोमलला तिथे पाहून त्याला काही वेगळे वाटू लागले. कोमल आता त्याच्या नजरेला नजर द्यायला काहीशी कचरत होती. अनिश तिच्या जवळ येऊन उभा राहिला.

“आज बस का सोडलीस”

“असेच”

“तू का मागे राहिलास?”

“आज सायकल नाही आणली, चालत जाईन, म्हणून उभा होतो. पण तू बस मध्ये चढताना दिसली नाहीस.”

“तुला काय ठाऊक मी इकडे आहे?” कोमलच्या ह्रदयाचे ठोके वाढले होते. तिने एक पाऊल अनिशकडे टाकले.  

“मग तू कोठे जाणार होतीस?” अनिशला आपली कानशील गरम झाल्याचा भास झाला. 

कोमल काही न बोलता अनिशच्या जवळ येऊन उभी राहिली. तिच्यात व अनिश मध्ये काही इंच अंतर उरले होते. 

दोघांच्या ही शरीराला थोडा कंप सुटला, कोमलने  नजर उचलून अनिशकडे पहिले. अनिशचा श्वास तिला चेहर्‍यावर जाणवला.

अनिशला काय होते आहे नक्की कळत नव्हते, भारी वाटतंय की भीती वाटते. एकच क्षण गेला असेल. “जो पर्यंत जमत नाही तो पर्यंत प्रयत्न कर, जमले की तुला भारी वाटेल” हे वाक्य कानी पडले. अनिशने कोमलला हळूच स्पर्श केला.

“कोण आहे तिकडे” मागून आवाज आला, कोणी तरी शाळेचे वर्ग बंद करायला आले होते.

दोघंही आवाजाने दचकले, कोमलला समोरून शाळेची रखवाली करणारे मामा येताना दिसले. आता दोघांची भीतीने गाळण उडली होती. रखवाली करणारे मामा तिथे आले अनिशला त्यांनी सहज ओळखले

“काय अनिश घरी जायला उशीर का करतोय?”

“अं , काही नाही मामा, कोमलची अभ्यासाची वही सापडत नाही म्हणून ती बघतो आहोत, हो ना कोमल?”

“हो ना, मामा, तुम्हाला दिसली वर्ग बंद करताना तर पहा बरं”

कशी  तरी वेळ टाळून गेली

प्रसंग ७

कोमल घरी बसने आली नाही म्हणून तिच्या वडीलांनी कोमलला धारेवर धरले. कोमल ओक्साबोक्शी रडून अनिश सोबत असल्याचे  बोलून गेली. दुसर्‍या दिवशी कोमलचे बाबा पोलीस घेऊन शाळेत आले. अनिश पुरता घाबरून गेला. पोलीसानी रखवालदार मामा व शाळेतील वर्ग शिक्षक यांना थोडी विचारपूस केली. कोमलच्या वडीलांच्या आग्रहामुळे जबानी सूचना देऊन घटना रद्द केली.

प्रसंग ८

शाळेत जाणे अनिशला अवघड वाटू लागले, अनिशचे वर्गात अभ्यासात लक्ष लागे ना. पहिला येणार मुलगा या छोट्या घटने मुळे मोडतो की काय यामुळे अनिशचे आई-बाबा काळजीत पडले. बाबानी अनिशला विचारले. अनिश भरल्या आवाजात म्हणाला “बाबा काय भारी आहे आणि काय नाही  यातील फरक नाही रे कळला मला. मग आणि ते समोर आल्यावर कसे वागावे ह्यात मी गडबडलो” आता ९ वीत  शाळा बदल करून आता दुसरी शाळा घेणे त्यांना क्रम प्राप्त झाले.

प्रतिक

प्रतिक कुरळे केस, बोलक चेहरा, वर्ण गव्हाळ, पिंगट डोळे, स्वभाव शांत, थोडासा अबोल पण विषय मिळला तर गप्पा खूप मारेल कारण माहिती खूप. ९ वीत शिकणारा मुलगा, वर्गात पहिल्या पाचात नंबर असे. प्रतिकचे बाबा बँकेत कामाला. रात्री झोपायच्या आधी चालायला जाणे व दोघांना गप्पा मारायला आवडे. 

प्रसंग १

वर्गात शिक्षकानी प्रश्न विचारला की सर्वात आधी उत्तर द्यायला तयार आणि कोणालाही प्रश्न पडला तर शिक्षक सांगण्या आधी त्या प्रश्नावर मुद्दे मांडणार मुलगा म्हणून प्रतिक सर्वांना माहिती आहे. कोणताही विषय असो त्यावर विचार मांडणे व चर्चा करणे ही प्रतिकची सहज प्रवृत्ती होती. प्रतिक वर्गात आला की सर्व मूला-मुलीना एक प्रकारचा आनंद होई. शिक्षकांना कदाचित काही वेळ अति बोलतो असेही वाटे. वर्गात सर्वांशी मिळून वागणे, काम असेल तर मोचके बोलणे आणि कोणाला प्रश्न असेल तर खूप चर्चा करणे हा प्रतिकच नैमित्तिक दिनक्रम असे.

प्रसंग २

नेहमी प्रमाणे प्रतिक जेवून रात्री बाबासोबत चालायला उतरला होता. प्रतिकचा आवडता विषय बायोलॉजी व त्यावरून रात्री आजूबाजूला येणारे रातकिडयाचे आवाज, कधी पाऊस पडला असेल तर  बेडूक ओरडतानाचे आवाज यावर प्रतिक व बाबाच्या गप्पा रंगत.

“तो ऐक आवाज आला का” प्रतिक

“नाही” बाबा

“नीट ऐक, मध्ये थांबून परत आवाज करतोय” प्रतिक

“ह आता आला” बाबा

“हा आवाज male frog चा आहे, ते त्याच्या female ला आकर्षित करायला असा आवाज करतात” प्रतिक

“तुला रे काय ठाऊक” बाबा

“अरे बाबा, ही खूप साधी गोष्ट आहे पाऊस पडून पाणी जमले की बेडूकांचा mating season येतो. काही काही बेडकांच्या जमातीत बेडूक मादी meting झाल्यावर नर बेडकाला खाऊन टाकते. कारण तिला अंडी देऊन तिथे बसून राहावे लागते मग तिला खायला दुसरे काही नाही मिळत” प्रतिक

“अरे हे तर भयंकर आहे” बाबा

“तीच तर गंमत आहे, तरी पण तो बेडूक mating call देतो.” प्रतिक

प्रसंग ३

वर्गात विषय कोणता ही असो त्यावर गप्पा मारणे व वेगवेगळे अर्थ काढणे ही नेहमीची चर्चा प्रतिक व चित्रा करीत. आजचा विषय होता city planning in Asia. या दोघांनी कंबोडियाची राजधानी फ़्नोम पेन्ह येथे सार्वजनिक सोई कशा आहेत यावर चर्चा केली. शाळे तर्फे गट बनवून नव्या युगातील शहर विकास उपक्रम यावर वाद विवाद आणि चर्चा करण्याची नाव नोंदणी केली. यात वेळ कसं गेला हे कळले नाही. तयारी करायला वेळ मिळावा म्हणून प्रतिक शाळेची बस सोडून चित्रा सोबत मागे थांबला. विषय दोघांच्या आवडीचा होता. पाण्याचे प्रश्न, पाऊस पडून येणारा पूर,या पासून वाचण्यासाठी जमिनी खाली जलन्निस्सारण रचना कशी बनवावी यावर विचार करून दोघ उशिरा घरी गेले.

प्रसंग ४

प्रतिक उशिरा घरी आल्यामुळे जेवायला उशीर झाला होता. त्यामुळे प्रतिक व बाबाना  रात्री चालायला उतरायला नेहमी पेक्षा उशीर झाला होता.

आज काही पाऊस पडला नव्हता. त्यामुळे बेडकांचे आवाज सोबतीला नव्हते. व रात्रीचे दिवे वाटेवर जागोजागी लागले होते. जिथे दिवे नाहीत तिथे वाटेवर अंधार होता. प्रतिक अजून ही जलन्निसारण उपक्रम वर विचार करत होता. त्यामुळे अजून गप्पा सुरू झाल्या नव्हत्या.  

चलता चलता वाटेच्या बाजूला असलेल्या बाकावर दोन व्यक्ति बसलेल्या दिसल्या. प्रतिक व बाबा त्यांच्या बाजूने गेले. तरी त्या दोघांना काही जाणवले नाही.

“तू बघितलेस?”

“काय?”

“ते काय करत होते?”

“नाही, कोण?”

“अरे कोण काय? त्या बाकावर बसलेले ते दोघे?”

प्रतिकने मागे  वळून पहिले, त्याला अंधारात नीट दिसले नाही. एक मुलगा व बाजूला एक मुलगी बसलेले दिसले

“नाही, नीट दिसत नाही ते, काय करतायत?”

“अरे बघ आपण परत जाऊ तेव्हा”

“बरं, तू काय विचार करतोयस?”

गप्पा सुरू झाल्या प्रतिक पाण्याचे प्रश्न कसे असतात यावर बोलू लागला. परतीच्या मार्गावर बाबानी त्याला हळूच जाणीव करून दिली की ते दोघे अजून आहेत.

“अरे ही नक्की काय करतायत?” प्रतिकने  आश्चर्य व्यक्त करीत विचारले. कारण त्याला दिसले की ती मुलगी, मुलांचा हात हातात घेऊन चक्क nail cutter घेऊन नख कापत होती. ते ही या अंधारात.

“हे बघ परवा तू मला नर बेडकाला खाणाऱ्या मादी बेडकीबद्दल सांगितले ना. माणसाचे ही बरेचसे तसेच आहे. या दोन व्यक्ती बद्दल आता तेच होत आहे, फक्त हे थोडे मानवी प्रकाराने आहे. पण mating call हा योग्य वेळी द्यावा ही गोष्ट नीट समजून घेतली तर काही चूक होणार नाही.”

प्रतिक क्षणभर या विचारात मग्न झाला व हसला काहीसा आणि परत गप्पा मारू लागला

प्रसंग ५

इकडे city planning ची स्पर्धा जवळ आली होती. प्रतिक व चित्रा रोज उशिरा थांबून तयारी करत होते. करताना नवीन जमिनी खालच्या नालीचा नकाशा तयार झाल्याच्या उत्साहात प्रतिकने चित्राला एकदम आनंदाने मिठी मारली, चित्राला तेवढाच आनंद झाला होता की हा नकाशा आपल्याला स्पर्धेत नाव मिळवून देईल. तिने ही मिठी स्वीकारली. त्या अवस्थेत प्रतिक चित्राच्या कानात कुजबुजला

“हा काही mating call नाही … चल सोड आता”

दोघांनी हसून आपापले हात मागे घेतले व नकाशा गुंडाळून इतर तयारीला लागले

प्रसंग ६

स्पर्धा चांगली झाली प्रतिक व चित्राच्या नकाशाला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. या प्रकारच्या स्पर्धेत त्यांच्या शाळेला मिळालेले ही पहिले पारितोषिक होते त्यामुळे शाळेने खूप कौतुक केले.

प्रसंग ७

आज रात्री गप्पा सुरू करायच्या आधी प्रतिक बाबाना म्हणाला तुम्ही त्या मानवी mating call ची उपमा  दिल्या मुळे  मला काय कुठे योग्य ही जाणीव किती सहज उमगली. आता mating call वर शंका नाहीच, तर यावर विचार आणि चर्चा करायला मी आणि माझे मित्र-मैत्रिणी सज्ज आहोत

all copy rights are with author @viveksathe21

22 responses to this post.

  1. Manasi Nikhilesh Godbole's avatar

    Posted by Manasi Nikhilesh Godbole on ऑगस्ट 19, 2020 at 3:21 सकाळी

    मुलांचं मन हे अतिशय संस्कारक्षम असतं जणूकाही टीप कागदासारख
    पालक जसे वागतात बोलतात त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर त्यांचं बारीक लक्ष असतं
    त्यातून ते खूप काही शिकत असतात
    त्या त्या वयात काय योग्य काय अयोग्य हे कळणे आवश्यकत आहे
    मुख्य म्हणजे आयुष्यात हवी असणारी प्रत्येक गोष्ट मिळतेच असे नाही
    तेव्हा छोट्याशा अपयशाने खचून न जाणे त्यातूनही मार्ग काढणे हे जमले पाहिजे
    आणि हे काम करण्याची जबाबदारी 100% पालकांची आहे
    म्हणजे त्यांच्या वागणुकीवर अवलंबून आहे

    Liked by 1 person

    उत्तर द्या

  2. deherkarsameer's avatar

    अनिश ची यात काही चूक झाली नाही
    त्याचे वयच आहे तसे
    पण पालक म्हणून…..ईयत्ता 7पासून पाल्या ला सांगितले पाहिजे की focus loose nahi zala pahije.,…pori n mule he hou शकते.
    त्या मुलीचा बाप खूप react kele त्याने
    पोरगी जरा उशिराच आली होती घरी
    We hv to give some freedom to them
    Ghara beher झालेल्या सगळ्या गोष्टी घरात आल्यावर आई बाबाला सांगणे …..ही सवय लागायला हवी
    तसे घरात वातावरण मुलांबरोबर लहानपणा पासून दे develope karave

    प्रतिकच्या भागांत, हो…..बापाने पोषक वातावरण तयार केले…..for thinking ….and differntiating diff emotions

    Liked by 1 person

    उत्तर द्या

    • vivsa's avatar

      खरंय समीर, थोडासा विश्वास व जाणीव आणि बरचसारा वेळ पालकांनी दिला तर मुल किती पटकन शिकेल. वातावरण निर्मिती ही पालकांची मोठी जबाबदारी आहे

      Like

      उत्तर द्या

  3. amolpandav's avatar

    चांगली तुलनात्मक मांडणी केली आहे. आजच्या सोशल मीडिया च्या युगात पालकांच्या जबाबदाऱ्या वाढल्या आहेत हे नक्की….आणि मुलांचा पालकांकडे बघण्याचा दृष्टीकोन पण बदलला आहे. अगोदरची पिढी एवढा विचार करत नव्हती. आणि जर घरामध्ये खूप मुलं असतील तर प्रत्येका सोबत वेळ घालवणे कठीण जात असेल. त्याकाळात मुले स्वतःच चांगले वाईट शिकून पुढे जात होती.

    आज पालकांनी मुलांना समजून घेणे, स्वतंत्र आणि स्वावलंबी निर्णय घेण्यात सक्षम करणे हे खूप महत्त्वाचे आहे.

    Liked by 1 person

    उत्तर द्या

    • vivsa's avatar

      खरे आहे, अमोल!

      पूर्वी कदाचित जमले नसेल, आताच्या छोट्या कुटुंबात, पालक व मुलांनी एकमेकांना वेळ देणे, वयानुसार एकत्र सृजनशील गोष्टी जसे वाचन, चित्र काढणे, वस्तु बनवणे – कागद वापरुन ओरिगामी, मातीचे किल्ला करणे, इत्यादी.

      ही करताना त्यातून छोट्या छोट्या गोष्टी शिकायला समोर येतात. विश्वासाचे घट्ट नाते निर्माण होते.

      Like

      उत्तर द्या

  4. मंगेश जोशी's avatar

    Posted by मंगेश जोशी on ऑगस्ट 19, 2020 at 4:46 pm

    दोन्ही कथा उत्तम आहेत व त्यातील संदेश छान पोहोचतोय. पालकांना ( प्राप्तेषु षोडशे वर्षे….) व मुलांना (मुक्त संवाद) या देान्ही गरजा अधोरेखीत होतात.
    भारतासारख्या (समाजाला जास्त महत्त्व असणाऱ्या) व्यवस्थेत कोमलच्या बाबांची प्रतिक्रिया समजून येण्यासारखी आहे.
    तसेच दुसऱ्या कथेच्या शेवटी, चित्रा समजूतदार नसती तर काय होऊ शकले असते, असाही एक विचार आला.
    पुढील कथेसाठी शुभेच्छा!!!

    Liked by 1 person

    उत्तर द्या

    • vivsa's avatar

      माझ्या मनातले मांडलेस मंगेश. प्राप्ते तु षोडशे वर्षे ..

      आणि तू म्हणालास ते ही, समज मुलगा किंवा मुलगी दोघांनाही सारख्या प्रकारे उमजली तरच चित्र पूर्ण होईल. तसे नाही झाले तर मिठी सुटणार नाही आणि एकेरी अपेक्षा भंगाची व्यथा सुरू होईल

      Like

      उत्तर द्या

  5. Dr Aditi phulpagar's avatar

    Posted by Dr Aditi phulpagar on ऑगस्ट 19, 2020 at 5:02 pm

    Mating call..
    छान आहे लेख . मुले जेव्हा वयात येतात तेव्हा घडणाऱ्या शारीरिक आणि मानसिक बदलांना समजून त्यांना हाताळणे ही काळाची गरज आहे.
    खूप subtle पद्धतीने मांडले आहेस

    Liked by 1 person

    उत्तर द्या

  6. अनिता फडके's avatar

    Posted by अनिता फडके on ऑगस्ट 19, 2020 at 5:57 pm

    छान लिहीलं आहेस विवेक.
    खरोखरच सध्या मुलांपेक्षा पालकांवरच जास्त जबाबदारी आहे. मुलांना आपल्याशी सगळं मोकळेपणी बोलावसं वाटलं पाहिजे आणि त्यावर आपण कशी प्रतिक्रिया देतो ते सर्वात महत्वाचं. या गोष्टीतील कोमल तिच्या बाबांशी परत कधी मनातलं बोलू शकेल का?
    आत्ताची पिढी खूप हुशार आहे. प्रतिक ला बरोबर समजलं त्याच्या वडिलांना के सांगायचं आहे. छोट्या छोट्या गोष्टी खूप काही शिकवून जातात.

    Liked by 1 person

    उत्तर द्या

    • गीता (साक्षी सुर्वे)'s avatar

      Posted by गीता (साक्षी सुर्वे) on ऑगस्ट 20, 2020 at 12:42 सकाळी

      विवेक..
      सुंदर प्रयत्न आहे…. सगळे भावनिक बारकावे छान पद्धतीने मांडले आहेस !!…. प्रसंगांची मांडणी सुद्धा उत्तम!!

      ह्या सारख्या घटना घडणे शक्य आहे आणि त्यातून मुलांनी व पालकांनी व्यवस्थित बाहेर पडणे ही काळाची गरज आहे!!

      हा लिखाणाचा छंद जोपासण्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा!!

      Liked by 1 person

      उत्तर द्या

      • vivsa's avatar

        गीता… धन्यवाद …

        मला ही मनापासून वाटतं की पालकांनी विचार करावा व त्याप्रमाणे नीट बारकाईने मुलामुलींना वागवावे

        Like

    • vivsa's avatar

      अनिता, धन्यवाद!
      मुला मुलींच्या मनावर किती पटकन ठासून उमटतो, आणि जसं तु म्हणतेय हा कोमलच्या मनावर झालेला ठसा किती पीडादायक असेल.

      Like

      उत्तर द्या

  7. Rashmi Bapat's avatar

    विवेक,
    खूप सुंदर पद्धतीने मांडला आहेस हा विषय. आजच्या काळात internet च्या माध्यमातून जणू संपूर्ण जगच सर्वांच्या हातात असते, त्यामुळे मनात अधिक प्रश्न निर्माण होणे साहजिकच आहे. पण जर घरात मोकळं वातावरण आणि मुक्त संवाद होत नसतील, तर ही कथा वाचल्यावर त्याचे किती महत्व आहे हे नक्कीच लक्षात येईल.

    छोट्या छोट्या गोष्टी आपल्या पाल्यासमोर कशा, कधी मांडाव्या यासाठी तुझ्या या लेखाने ‘खारीचा वाटा’ उचलला यात शंकाच नाही.

    पुढील लिखाणासाठी शुभेच्छा!

    Liked by 1 person

    उत्तर द्या

  8. नेहा गोरे's avatar

    Posted by नेहा गोरे on ऑगस्ट 20, 2020 at 9:33 सकाळी

    विवेक खुप छान प्रयत्न .

    Like

    उत्तर द्या

  9. Richa sane's avatar

    Posted by Richa sane on ऑगस्ट 20, 2020 at 12:33 pm

    दोन्ही गोष्टी वाचल्या. उत्तम मुद्देसूद रचना केली आहे. आणि कसं वागायचं किंवा कोणत्या गोष्टीला, वेळेला कसा प्रतिसाद द्यायचा ( react vhayche)
    हे game च्या माध्यमातून समजू शकत नाही तर आयुष्यात घडणार्या खर्या घटनांनमधूनच कळते, हे पालकांना समजले तर मुलेही उत्तम घडतात.

    Liked by 1 person

    उत्तर द्या

  10. शिल्पा टेंगळे's avatar

    Posted by शिल्पा टेंगळे on ऑगस्ट 20, 2020 at 3:29 pm

    दोन्ही कथा उत्तम आहेत..
    पालक आणि मुलांमध्ये हल्ली मित्रत्वाचं नातं निर्माण झालं आहे.हे त्यांच्या मधला संवाद सुधारण्याकरिता आणि एक विश्वासाचं नात जोपासण्याकरिता खूप गरजेचं आहे पण त्या बरोबरचं आपण पालक आहोत ,मुलांपेक्षा जास्त अनुभवी आहेत याचं भान पालकांनी ठेवायला हव. कोणत्या वयात काय योग्य काय अयोग हे मुलांना समजावून सांगितले पाहिजे. तसच मुलांनी पालकांच्या प्रति योग्य आदर बाळगला पाहिजे.

    Liked by 1 person

    उत्तर द्या

    • vivsa's avatar

      धन्यवाद शिल्पा!

      वर मंगेशनी मांडले त्या सुभाषिताचा “… प्राप्त्तेतु षोडशे वर्षे पुत्रम् मित्रवत् आचरेत।”
      त्याचा पुर्ण अर्थ असा आहे की ०-५ वर्षापर्यंत लाडाने मुलामुलींना वाढवावे, ५-१५ वयापर्यंत वेळ पडली तर ताडन करावे पण १५ वयापुढे मुलामुलींना मित्र मैत्रीण प्रमाणे वागवावे.
      हा बोध दोन्ही पक्षांना – पालक व पाल्य यांना वयानुसार नाते गुंफले जाते तसे उलगडत समोर आला पाहिजे.

      Like

      उत्तर द्या

यावर आपले मत नोंदवा