दिवस उजाडतो आणि मागोमाग रात्र येते. आज काय नवीन केले हा प्रश्न मागे उरतो. हातुन काही चांगले काम घडले की नुसताच वेळ गेला… बाकी काही नाही, निदान काही चांगला विचार तरी केला का?
विचार करणे हे वरवर thought, consideration, decision opinion या इंग्लिश भाषांतराशी जोडले जाते, पण डोक्यात येणारे नुसते thoughts म्हणजे विचार नव्हे. मनात येणाऱ्या लहरीना तर्क आणि वितर्काच्या तराजूत तोलून बुद्धीचा निकष लावून एक ठाम लहर तयार झाली की तिला विचार म्हणावे.
वितर्कविचारानन्दास्मितारूपानुगमात् संप्रज्ञातः ॥ १.१७॥
महर्षि पतंजली, समाधी पाद
मग असा विचार व्यक्त होण्यासाठी धडपड करतो आणि सामान्य मानवातून लेखक/लेखिका बनवतो. विचाराच्या लहरी मग तुर्या, पश्यन्ति मध्यमा ते वैखरी अशा चत्वार वाणीच्या मार्गे शब्द बनुन लेखणीत उतरतात. लिहून मग ती गोष्ट असेल, कविता किंवा चारोळी असेल, कथा नाहीतर लेख, जेव्हा तो विचार अवतरतो तेव्हा त्याला धारण करण्यासाठी ह्या “Blog”ची निर्मीती झाली.
नमू शारदा मूळ चत्वार वाचा ।
समर्थ रामदास स्वामी, मनाचे श्लोक

विवेक भास्कर साठे
लेखक, संचालक
तसे ओळख द्यायला मी कोणी नावाजलेला नाही. कोणत्याही विषयावर विचार मांडु शकतो अगदी कामशास्त्रा पासुन ते ब्रह्मानंदा पर्यंत. मानवी जैविक गुणसुत्रांचे हवे तसे बदल करण्याची संभावना असल्याचे तंत्र CRISPR, तसेच सुक्ष्म शरिरीप्रवास हे विषय मला प्रभावित करतात.
संपर्क: @vivek_sathe

सौ मानसी निखिलेश गोडबोले
लेखिका
सर्वांसारखी गृहिणी, शिक्षिका, पूर्ण शाकाहारी, अभिमान आहे भारतीय हिंदू ब्राह्मण घरी जन्म झाल्याबद्दल.
संपर्क: @manasigodbole

अमोल विजय पांडव
लेखक
मराठी कथा, कादंबऱ्या वाचन आणि थोडेफार लिहिण्याचा प्रयत्न.
धावणे, खेळ आणि मित्रांसोबत गप्पा मारणे हे आवडते छंद.
संपर्क: येतोय
