Archive for the ‘आरती’ Category

नाना परिमळ दूर्वा

नानापरिमळ दूर्वा शमिपत्रे ।
लाडू मोदक अन्ने परिपूरित पाते ॥
ऐसे पूजन केल्या बीजाक्षरमंत्रे ।
अष्टहि सिद्धी नवनिधि देसी क्षणमात्रे ॥१॥

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
तुझे गुण वर्णाया मज कैची स्फूर्ती ॥ ध्रु० ॥

तुझे ध्यान निरंतर जे कोणी करिती ।
त्यांची सकलहि पापे विघ्नेही हरती ॥
वाजी वारण शिबिका सेवक सुत युवती ।
सर्वहि पावुनि अंती भवसागर तरती ॥ जय देव० ॥ २ ॥

शरणागत सर्वस्वे भजती तव चरणी ।
कीर्ति तयांची राहे जोवर शाशितरणी ॥
त्रैयोक्यो ते विजयी अद्भुत हे करणी ।
गोसावीनंदन रत नामस्मरणीम ॥ जय देव जय देव० ॥३॥

आरती शब्द मराठी माती येथून घेतले आहेत

शेंदुर लाल चढायो

शेंदुर लाल चढायो अच्छा गजमुखको ।
दोंदिल लाल बिराजे सुत गौरीहरको ॥
हाथ लिये गुडलड्डू साई सुरवरको ।
महिमा कहे न जाय लागत हूँ पदको ॥१॥

जय जयजी गणराज विद्या सुखदाता ।
धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता ॥ ध्रु० ॥

अष्टी सिद्धी दासी संकटको बैरी ।
विघ्नविनाशन मंगलमूरत अधिकाई ॥
कोटीसुरजप्रकाश ऐसी छबि तेरी ।
गंडस्थलमदमस्तक झुले शशिबहारी ॥जय० ॥२॥

भावभगतिसे कोई शारणागत आवे ।
संतति संपति सबही भरपूर पावे ॥
ऐसे तुम महाराज मोको अति भवे ।
गोसावीनंदन निशिदिन गुण गावे ॥ जय० ॥३॥

आरती शब्द मराठी माती येथून घेतले आहेत

सुखकर्ता दु:खहर्ता

सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ॥
सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची ।
कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥१॥

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ध्रु॥

रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ॥
हिरेजडीत मुगुट शोभतो बरा ।
रुणझुणती नूपरें चरणीं घागरिया॥२॥

लंबोदर पीतांबर फणिवरबंधना ।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ॥
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटीं पावावें निर्वाणीं रक्षावें सुरवर वंदना ॥ ७॥

आरती शब्द मराठी माती येथून घेतले आहेत.


माझ्या लेखिका मैत्रिणी सोनालीहीने तिला सापडलेली या आरतीची बाकीची कडवी तिच्या ब्लॉग वर ठेवली आहेत. ती येथे खाली देतो आहे.

माथा मुकुट मणी कानी कुंडले ।
सोंड दोंदावरी शेंदुर चर्चिले ।।
नागबंद सोंड-दोंद मिराविले ।
विश्वरूप तया मोरयाचे देखिले ॥ जय० ॥३॥

चतुर्भुज गणराज बाही बाहुटे ।
खाजयाचे लाडू करुनी गोमटे ।।
सुवर्णाचे ताटी शर्करा घृत ।
अर्पी तो गणराज विघ्ने वारीतो ॥ जय० ॥४॥

छत्रे चामरे तुजला मिरविती ।
उंदीराचे वाहन तुजला गणपती ।।
ऐसा तु कलीयुगी सकळीक पाहसी ।
आनंदे भक्तासी प्रसन्न होसी ॥ जय० ॥५॥

ता ता धि मि किट धि मि किट नाचे गणपती ।
ईश्वर पार्वती कौतुक पाहती ।।
ताल मृदंग वीणा घोर उमटती ।
त्यांचे छंदे करुनी नाचे गणपती ॥ जय० ॥६॥