रविवार सकाळ

काल दिवस भर पाऊस पडून गेल्याने ही रविवार सकाळ,
नुकतीच आंघोळ होऊन स्वच्छ झालेली,
रात्रभर धुक्याची हलकी चादर पांघरून पडलेली झाडे,
त्या चिंब भिजून गेलेल्या रस्त्यावरुन
गार गार वाऱ्याचा कानाला आणि अंगाला स्पर्श घेत
एखादे सुरेख गाणे गुणगुणत शीळ घालीत
मनसोक्त सायकल चालवण्याचा
सुखद अनुभव घेण्याची सकाळ

… हा अनुभव कसा सोडून चालेल
चला तर मग आमच्या या रम्य सायकल सफरीवर

घरून निघाल्यावर

ठिकाण आहे मंडई तळे आजूबाजूला आहे केवळ घनदाट झाडी
मोकळे रस्ते शहरापासून फार दूर नाही पण शांत वातावरण

दुतर्फा घनदाट झाडी, आखून ठेवलेले रस्ते, वर निळे आकाश
आणि अदबीने चालवणारे गाडीवाले

सायकलवाले मध्ये आले म्हणून त्यांना काही भोंगा वाजवून घाबरवत नाहीत
हलकेच गाडी बाजूने नेतील

अश्या रविवारी सकाळी लांबवर पळणारी मंडळी ही या ठिकाणी येतात
व कदाचित सायकली चालवणाऱ्यांचे थवे ही जाताना दिसतील

एकंदरीत मंडई तळ्यावर जाण्याचा रस्ता सायकल चालवण्यासाठी खूप रम्य आहे

सोबत आहेत सायकलस्वार नीता आणि तपस्विनी आणि जितेंद्र उर्फ जेके

रस्ता आहे १३-१४ किमी पण अशी गार हवेशीर सकाळ गर्द झाडी
निळे आकाश अनुभवत किती किलोमीटर गेले हे कळत नाही
तरी मंडई तळ्यावर पोहोचले की काय मांडून ठेवले आहे? कशासाठी केला हा अट्टहास?

मंडई तळ्यावर पोहोचल्यावर

चहु बाजूने नटलेल्या हिरव्यागार झाडांच्या अनुभवाने, तरंगणाऱ्या पांढऱ्या ढगांनी,
त्यांना हलकेच बाजूला सारून डोकावून बघणाऱ्या सूर्य किरणांनी
खुले आकाश व निळे पाणी पाहून
सारे श्रम क्षणार्धात नाहीसे होतात

आता एक तरी solo pic बनता है ना !!
बनता है तो मेरा भी निकलो
या उत्साही वातावरणाची कमाल काही औरच आहे
मग थकलेलली सायकलवाली मंडळी उड्या मारायला ही कमी करत नाही
स्वचित्र (सेल्फी) काढल्या शिवाय पाय निघत नाही
या आठवणी हीच या सफरीची खरी कमाई

जोडीदारासोबत या रम्य वातावरणात काही क्षण निवांत घालवून पुनः परतीची वाट धरली
मागे वळून पाहिल्याशिवाय सायकलीला वेग धरता येत नाही

परतीचा प्रवास

आता वाहनांची रहदारी वाढली आहे
या जोरात जाणाऱ्या वाहनांनी वाहत्या रस्त्यावर ही सायकलवाली मंडळी आली
तरी मोठ्या गाड्या काळजी पूर्वक आपापली वाट धरून जातात

आता उन्ह जाणवू लागतात तसेच मगाशी जे पक्षी किलबिल करत होते तसेच काहीसे पोटात “काव काव” होत असल्याचे जाणवते
मग आपोआप वेग वाढतो, उताराचा रस्ता आपला मित्र आहे असे वाटू लागते
चला चला कोण पुढे चालतो तो
शहर दिसू लागते तसे निळे आकाश आणि हिरवी झाडे मागे राहू लागती
वेग मंदावला असला तरी चेहऱ्यावर तजेला आणि मनात भरपूर समाधान साठवलेले असते

भेटूया रम्य मंडई तळ्यावर पुनः केव्हा तरी

मंडई तळ्याचा मार्ग

@विभासा

14 responses to this post.

  1. तपस्विनी's avatar

    Posted by तपस्विनी on सप्टेंबर 6, 2020 at 6:52 सकाळी

    अतिशय सुन्दर वर्णन झालेय रविवार सकाळ चे!

    Liked by 1 person

    उत्तर द्या

  2. manasi godbole's avatar

    वा फारच सुरेख वर्णन अतिशय सुंदर अशा पावसाळी वातावरणात स्वतः जणू सायकलवरून फेरफटका मारून आल्यासारखे वाटले मन प्रसन्न झाले

    Liked by 1 person

    उत्तर द्या

  3. amolpandav's avatar

    हिरवे हिरवेगार गालिचे – हरित तृणाच्या मखमालीचे….हिरवेगार वातावरण पाहून बालकवींची कविता आठवली. उगाच नाही गार्डन सिटी नाव पडले आहे या सुंदर शहराला…सुरेख वर्णन केले आहेस. सायकलवर चित्रीकरण पण छान झाले आहे.
    जपून चालवा सायकली आणि मोठ्या रपेटी टाकत रहा.

    Liked by 1 person

    उत्तर द्या

    • vivsa's avatar

      धन्यवाद प्रिय मित्रा, सायकल नक्की जपून चालवू…
      खरंय हिरवा रंग या बेटावर कुठे ही गेलं तरी कमी पडणार नाही. नीताच्या शब्दात -> पाचूचे बेट!

      Like

      उत्तर द्या

  4. Mangesh's avatar

    Very nice road to ride on cycle and equally nice photography

    Like

    उत्तर द्या

  5. Sonali Deolekar's avatar

    Posted by Sonali Deolekar on सप्टेंबर 6, 2020 at 2:42 pm

    अतिशय सुंदर वर्णन..

    Like

    उत्तर द्या

  6. ANITA PHADKE's avatar

    खूप छान वर्णन आणि चित्रीकरण सुद्धा खूप छान.

    Liked by 1 person

    उत्तर द्या

  7. amit951's avatar

    अतिशय सुरेख रस्ता, सुंदर वातावरण आणि तूझे जिवंत प्रवासवर्णन!
    घर बसल्या आम्हाला मंडई तळ्याचे दर्शन घडवल्या बद्दल धन्यवाद!!
    प्रत्येक सकाळी अशीच शरीराला आणि मनाला नवा जोश आणि उमेद देणारी जावो।

    Liked by 1 person

    उत्तर द्या

यावर आपले मत नोंदवा