काल नीता आणि तिच्या मैत्रिणी, महाराष्ट्र मंडळातर्फे आयोजित, मनस्ताप निवारण व्याख्यान ऎकायला गेल्या होत्या. व्याख्यानाची वेळ ७ ते ९ अशी होती. फलस्वरुप, वैदेह आणि अथर्व दोघे संध्याकाळी माझ्यासोबत होते. अथर्वचे बाबा कार्यालयातुन परत येण्यास दोन तास अवधी होता. या दोघांना “रोबो डिफ़ेन्स” खेळाचे धडाम-धुडुम आवाज ऎकवुन जवळ-जवळ ३० मिनिटे घालवली. तो पर्यंत दोघेही विमान उडवण्याच्या इच्छेने प्रेरित झाले होते. एकीकडे माझे जेवण मी उरकुन घेतले, रात्रीचे ७:३० (:-). दोघांना भुक लागली नसल्या कारणने, मात्र एक-दोन बिस्कीटे खायला घातली. तेवढ्यात श्लोक म्हणण्याची कल्पना वैदेह आणि अथर्व, दोघांना पसंत पडली. एका मागुन एक दोघे श्लोक म्हणु लागले. याची परिणिती खालील चलचित्रात झाली.
पुढे खाली जाउन विमाने उडवण्याचा खेळ जवळ-जवळ एक तास रंगला. मग सुमारे ८:४५ वाजता अथर्वचे बाबा आल्यावर दोघे आपापल्या घरी गेले. आणि माझ्या अजुन एक रंगतदार दिवसाची पुर्ति झाली.
Posted by Mihir Gangal on ऑक्टोबर 6, 2010 at 4:44 pm
good!!! keep writing… actually… evn i m planig(!) to start writing somethng…. gr8 gr8… i wud certainly read ur future blogs….. happy blogging!!!!
LikeLike